शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

धक्कादायक! पतीसोबत झालेल्या भांडणानंतर पोटच्या पाचही मुलांना मातेनं दिलं गंगेत फेकून

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 8:30 AM

पोलिसांच्या मदतीनं स्थानिक पाणबुड्यांकडून पाचही मुलांचा शोध घेतला जात असता, तिची मुलगी वंदना हिचा मृतदेह सापडला आहे. इतर मुलांच्या मृतदेहाचा शोध घेतला जात आहे.

भदोही : पतीसोबत झालेल्या वादानंतर एका महिलेनं पोटच्या पाचही मुलांना गंगेत फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील भदोही जनपद येथील गोपीगंज पोलीस हद्दीतील जहांगीराबाद गंगा घाटावर घडलेली ही घटना परिसरात समजल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या मदतीनं स्थानिक पाणबुड्यांकडून पाचही मुलांचा शोध घेतला जात असता, तिची मुलगी वंदना हिचा मृतदेह सापडला आहे. इतर मुलांच्या मृतदेहाचा शोध घेतला जात आहे. ती महिला शनिवारी मध्यरात्री दोन वाजता मुलांना घेऊन गंगा घाटावर पोहोचली, तेव्हा तिचा पती घरी नव्हता. त्यानंतर तिनं एक एक करून पाचही मुलांना गंगेत ढकलून दिलं. या प्रकाराची गावात आणि कुटुंबीयांपर्यंत माहिती पोहोचल्यानंतर खळबळ उडाली. गावकऱ्यांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिलेली असून, गोपीगंज पोलीस स्थानिकांच्या मदतीने मुलांचा शोध घेत आहेत. जिल्हाधिकारी राजेंद्र प्रसाद आणि पोलीस अधीक्षक राम बदन सिंग यांनीसुद्धा घटनास्थळी पोहोचून बचावकार्याला सुरुवात केली आहे. त्यामुळे मुलांचा शोध घेण्याची प्रक्रियेला वेग आला असून, इतर मृतदेहसुद्धा लवकरच सापडतील, असं पोलिसांनी सांगितलं आहे.जहांगीराबाद गावात राहणाऱ्या मंजू यादव या महिलेनं हे निर्दयी कृत्य केलं आहे. वंदना (12), रंजना (10), पूजा (6), शिव शंकर (8) आणि  संदीप (5) अशी मुलांची नावं आहेत. पहिल्यांदा महिलेने आपल्या तीन मुलांना गंगेत फेकून दिलं, त्यानंतर अन्य दोन मुलांना गंगेत फेकून ती घरी निघून आली, अशी माहिती महिलेनं पोलिसांना दिली आहे. पोलीस आता प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.