शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

अतिरेक्यांकडून महिलेची हत्या, काश्मीरमध्ये झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात जवान जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 4:57 AM

दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात अतिरेक्यांनी रविवारी महिलेला ठार मारले व दुसरीला गंभीर जखमी केले. हा हल्ला जैश-ए-महंमदने केल्याचा पोलिसांचा संशय आहे.

श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात अतिरेक्यांनी रविवारी महिलेला ठार मारले व दुसरीला गंभीर जखमी केले. हा हल्ला जैश-ए-महंमदने केल्याचा पोलिसांचा संशय आहे.मृत महिलेचे नाव यास्मिना (रा. खोनमोह) असून, रुबी (रा. सीर त्राल) जखमी झाली. नूर मोहम्मद तांत्रे उर्फ नूर त्राली हा या दोघींपैकी एकीशी संबंधित असून, श्रीनगर विमानतळानजीक असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या छावणीवर नुकत्याच झालेल्या अतिरेकी हल्ल्यात नूर हा मुख्य संशयित आहे.^त्राल भागात नॅशनल कॉन्फरन्सचे नेते मोहम्मद अश्रफ भट यांच्या निवासस्थानावर अतिरेक्यांनी रविवारी ग्रेनेडने हल्ला केला. त्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा जवान जखमी झाला. नॅशनल कॉन्फरन्सचे माजी आमदार मोहम्मद सुभान भट यांचा मोहम्मद अश्रफ भट हा मुलगा आहे. दक्षिण काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांत राजकीय नेत्यांना लक्ष्य केलेला हा तिसरा हल्ला आहे.लांगेत (जिल्हा कुपवाडा) भागात सुरक्षा दलांशी रविवारी झालेल्या चकमकीत अतिरेकी ठार झाला. अतिरेक्याला शोधण्याची मोहीम हाती घेताच चकमक उडाली. पाकिस्तानी सैनिकांनी कमलकोटे (उरी सेक्टर, जिल्हा बारामुल्ला) भागात नियंत्रण रेषेवर रविवारी सलग दुसºया दिवशी युद्धविरामाचे उल्लंघन केले. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.>सलग दुसºया दिवशी पाकचा गोळीबारसलग दुसºया दिवशीही पाकिस्तानी सैन्याने कोणतेही कारण नसताना गोळीबार केला. भारतानेही त्याला चोख प्रतिउत्तर दिले. शनिवारी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात लष्कराचा हमाल ठार व दोन महिला जखमी झाल्या होत्या.