Video - नारीशक्ती! महिला आमदाराचा हटके अंदाज; घोडेस्वारी करत विधानसभेत, दिला मोलाचा संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 03:49 PM2022-03-08T15:49:42+5:302022-03-08T15:51:33+5:30
Congress MLA Amba Prasad : महिला दिनाचा संदेश देण्यासाठी आमदार चक्क घोड्यावरून विधानभवनात पोहोचल्या आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली - जगभरात महिला दिन (Women’s day) मोठ्य़ा उत्साहात साजरा केला जात आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने महिला दिनाच्या निमित्ताने खास संदेश आणि शुभेच्छा देत आहे. य़ाच दरम्यान एका महिला आमदाराचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला आहे. महिला दिनाचा संदेश देण्यासाठी आमदार चक्क घोड्यावरून विधानभवनात पोहोचल्या आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.
महिला दिनानिमित्त झारखंडच्या काँग्रेस आमदार अंबा प्रसाद (Congress MLA Amba Prasad) यांची जोरदार चर्चा रंगली आहे. चक्क घोड्यावर स्वार होऊन त्य़ा आज विधानसभेत दाखल झाल्या. अंबा प्रसाद यांनी माध्यमांशी संवाद साधला. फक्त आजचाच नाही तर रोजचाच दिवस आमचा महिलांचा असतो. आज महिला दिनाचं औचित्य साधत मी घोडस्वारी करण्याचा निर्णय घेतला कारण समाजाच्या विचारसरणीत बदल व्हावा असं मला वाटतं. सर्वच क्षेत्रांत महिलांची भागीदारी वाढावी, यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत असं म्हटलं आहे.
#WATCH Congress MLA Amba Prasad rides a horse to Jharkhand Assembly on #InternationalWomensDay2022
— ANI (@ANI) March 8, 2022
There is Durga, Jhansi ki Rani in every woman, she should face every challenge with strength. Parents must educate their daughters as women are doing well in every field,she says. pic.twitter.com/dUAT2kX2BD
"घोडेस्वारी आपल्याला खूप आवडते. मुलीच्या आई-वडिलांनी आपल्या मुलींना खूप शिकवावं, महिलांचं योगदान सर्वच क्षेत्रांत वाढावं, यासाठी पालकांनी त्यांना शिक्षण द्यावं. प्रत्येक स्त्रीमध्ये दुर्गा, झाशीची राणी आहे, महिलांनी प्रत्येक आव्हानाला सामर्थ्याने सामोरं जावं. महिला प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करत असल्याने पालकांनी आपल्या मुलींना शिक्षण दिले पाहिजे" असंही अंबा प्रसाद य़ांनी म्हटलं आहे. अंबा प्रसाद यांचा घोडेस्वारी करत विधानसभेत जातानाचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.