लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतातील ५३ टक्के शहरी महिला घरातील कामाच्या ओझ्यामुळे दिवसातून एकदाही घराबाहेर पडत नसल्याचे अहवालातून समोर आले आहे.
‘जेंडर गॅप ईन मोबिलिटी आऊटसाईड होम ईन अर्बन इंडिया’ अहवालानुसार, भारतीय स्त्रिया विशिष्ट कारण असेल तरच घराबाहेरच पडतात. परंतु पुरुषांसाठी ते आवश्यक नसते. भारतातील शहरांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या या अभ्यासात सुमारे ८४,२०७ महिला आणि ८८,९१४ पुरुषांचा समावेश करण्यात आला होता. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) दिल्लीशी संबंधित राहुल गोयल यांनी हे संशोधनात केले आहे.
नोकरीच्या संधीही कमीवय वाढण्यासोबतच पुरुष आणि स्त्रियांचेही शिक्षणातील प्रमाण कमी होत जाते आणि वयाच्या २५ नंतर हे प्रमाण खूपच कमी होते. या वयात पुरुषांच्या नोकऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ होते. परंतु महिलांच्या संधींमध्ये वाढ होत नाही. त्यामुळे त्या घरीच राहतात. कामाच्या वयात आणि सेवानिवृत्तीपूर्वी (६० वर्षे) पुरुष आणि महिलांच्या रोजगारातील अंतर अधिक आहे. रोजगाराच्या संधी प्रगतीवर परिणाम करतात.
४७% महिला दिवसातून केवळ एकदा घराबाहेर पडतात. ८७% पुरुष दिवसातून एकदा तरी घराबाहेर पडतात. याचा अर्थ असा, की केवळ खूप कमी पुरुष घरी असतात.
nशिक्षणासाठी ८१टक्के मुली दिवसातून किमान एकदा घराबाहेर पडतात. पुरुषांमध्ये हेच प्रमाण ९० टक्के इतके आहे. मात्र, एकदा का त्यांचे शिक्षण थांबले, की घराबाहेर पडण्याची शक्यता कमी होते.