शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

Gandhi Jayanti 2020 : महिलांनो, आत्मसंरक्षणासाठी जे करता येईल ते करा! अहिंसावादी बापूंचा संदेश

By हेमंत बावकर | Published: October 02, 2020 12:57 PM

Mahatma Gandhi message for women's: महिलांविरोधातील अत्याचार, गुन्ह्यांवर गांधी यांचे विचार स्पष्ट होते. मुलांना त्यांनी या संदर्भात एक पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी महिलांनी आत्मसंरक्षणासाठी जे काही करावे लागेल ते करावे, असा सल्ला दिला होता.

मोहनदास करमचंद गांधी....यांना अवघे जग महात्मा गांधी या नावाने ओळखते. आजच्या जगात गुन्हेगारी एवढी वाढली आहे की, बापूंचे विचार समजून त्याचे आचरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये दोन दिवसांत तीन मुलींवर बलात्कार झाले आहेत. राजस्थानमध्येही अशीच घटना घडली आहे. यावर आयुष्यभर अहिंसेची शिकवण देणारे बापू काय सांगतात माहित आहे? एका पत्रात महात्मा गांधी यांनी हा सल्ला दिला आहे. 

महिलांविरोधातील अत्याचार, गुन्ह्यांवर गांधी यांचे विचार स्पष्ट होते. मुलांना त्यांनी या संदर्भात एक पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी महिलांनी आत्मसंरक्षणासाठी जे काही करावे लागेल ते करावे, असा सल्ला दिला होता. बलात्कार झालेल्या स्त्रीचा कोणत्याही प्रकारे तिरस्कार केला जाऊ नये असे त्यांचे मत होते. तसेच त्यांनी आपल्या मुलांनाही महिलांसोबत आदरपूर्वक वागण्याची सक्त ताकीद दिली होती. आपल्या मर्यादांचे उल्लंघन करू नये, असेही त्यांनी म्हटले होते. 

'द माइंड ऑफ महात्‍मा गांधी' पुस्तकात वाईट प्रवृत्ती आणि महिलांवरील अत्याचारावर गांधींचे विचार मांडण्यात आले आहेत. यानुसार गांधींनी म्हटले आहे की, जर महिला हल्लेखोराच्या शारीरिक ताकदीला प्रतिकार करू शकत नसेल तर तिचे पावित्र्यच तिची ताकद बनेल. सीतेचे उदाहरण घ्या. शारीरिक दृष्ट्या सीता रावणासमोर शक्तीहीन होती. मात्र, तिची पवित्रता रावणाच्या ताकदीपेक्षा जास्त शक्तीशाली होती. रावणाने सीतेचे मन अनेक प्रलोभने देऊन जिंकण्याचा प्रयत्न केला. मात्र, सीतेला तो हातही लावू शकला नाही. माझ्या मतानुसार निडर महिला हे जाणते की तिचे पावित्र्यच तिची सर्वात मोठी ढाल आहे. मनुष्यच नाही तर आग्नीही तिच्यासमोर लाजेल, असे गांधी यांनी म्हटले आहे. 

महिलेच्या प्रश्नांना गांधींचे खुले उत्तरएका महिलेने बापुजींना तीन प्रश्न विचारले होते. यावर त्यांनी दिलेले उत्तर खरेच विचार करायला लावणारे आहे. गांधींनी 1942 मध्ये ‘हरिजनबंधु’ नावाच्या गुजराती नियतकालीकेमध्ये हे उत्तर दिले होते. ''ज्या महिलेवर बल्ताकाराचा प्रसंग ओढवला ती तिरस्काराच्या नाही तर दयेची पात्र आहे. ती स्री जखमी झालेली असते, यामुळे ज्याप्रकारे आपण जखमींची सेवा करते तशीच सेवा तिची केली पाहिजे. शील भंग कोणाचे होते? जी स्त्री शारिरीक संबंधांना तयार होते तिचे. बलात्कार झालेली स्त्री त्या नराधमाला विरोध करते. यामुळे शील भंग हा शब्द बदनामी करतो. यामुळे बलात्कार हा योग्य शब्द त्या स्त्रीबाबत वापरला जावा, असेही गांधी म्हणाले होते. 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीRapeबलात्कारWomenमहिलाUttar Pradeshउत्तर प्रदेश