उत्तर प्रदेशमधील झाशी येथे कुत्र्याला फिरवण्यावरून महिलांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मारहाण होत असताना पाहून एका तरुणीचा भाऊ बचाव करण्यासाठी मध्ये पडला. पण त्यालाही मारहाण करण्यात आली, त्यात तो जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओची पोलिसांनी दखल घेतली असून, पुढील कारवाई सुरू केली आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये एका तरुणीला एक तरुण आधी काठीने मारहाण करताना दिसत आहे. त्यानंतर एक महिला येते आणि ती त्या तरुणीला मारहाण करण्यास सुरुवात करते. दोघीही एकमेकींच्या झिंज्या उपटून भांडायला सुरुवात करतात आणि जमिनीवर पडतात. यादरम्यान तरुणीचे कपडे फाटतात. हे पाहून तिचा भाऊही भांडणात मध्ये पडतो. मात्र त्यालाही मारहाण केली जाते.
त्यानंतर घटनास्थळावर आणखी काही महिला पोहोचतात आणि भांडण करत असलेल्या तरुणीचे केस ओढून तिला खाली आपटतात. हा वाद निवळल्यानंतर जखमी तरुणी आपल्या भावाला घेऊन रुग्णालयात पोहोचते. तिथे ती आपलं नाव मंजू शुक्ला असल्याचं सांगते. तसेच ती तिला झालेल्या दुखापतीही दाखवते.
दरम्यान, मंजू सांगते की, येथे राहणारे लोक आम्हाला शिविगाळ करत होके. माझा भाऊ जेव्हा घराच्या बाहेर पडला तेव्हा त्यालाही विरोध करण्यात आला. तसेच त्यालाही मारहाण करण्यात आली, अशी माहिती त्याने दिली.