लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलाही करू शकतात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 12:44 PM2023-08-18T12:44:06+5:302023-08-18T12:50:32+5:30
महिला कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा नोंदवू शकतात, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
कोची : लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलाही कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करू शकतात, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे. महिला कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा नोंदवू शकतात, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, महिला ज्या व्यक्तीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे आणि जर त्या व्यक्तीने तिच्यावर अत्याचार करण्यासाठी हात उचलला तर ती महिला डीव्ही कायद्यांतर्गत तक्रार दाखल करू शकते, असे केरळ उच्च न्यायालयाने सांगितले.
TOI मधील एका वृत्तानुसार, न्यायमूर्ती अनिल के नरेंद्रन आणि पीजी अजितकुमार यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. ज्या महिलांचे घरगुती संबंध आहेत अशा पुरुषांकडून विविध प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडलेल्या महिला डीव्ही कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करू शकतात. तसेच, खंडपीठाने असेही नमूद केले की, हा कायदा दोन व्यक्तींमधील संबंध म्हणून घरगुती नातेसंबंध परिभाषित करतो, म्हणजे विवाहानंतर एकत्र राहणाऱ्या व्यक्ती आणि अविवाहित व्यक्ती परस्पर भागीदारीत एकत्र राहतात.
कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या कलम १२ अंतर्गत तक्रार
दरम्यान, लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिला कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या कलम १२ अंतर्गत तक्रार करू शकतात. एका व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने असे सांगितले. कारण त्याच्यावर घरगुती हिंसाचार कायद्याच्या कलम १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, हा गुन्हा संबंधित व्यक्ती न्यायदंडाधिकार्यांसमोर कौटुंबिक न्यायालयात हस्तांतरित करू इच्छित होती, परंतु न्यायालयाने ते फेटाळले.