नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या फायर ॲण्ड फुरी कॉर्प्सच्या महिला अधिकारी कॅप्टन शिवा चौहान यांना जगातील सर्वात उंच युद्धक्षेत्रात तैनात केले आहे. कॅप्टन शिवा सियाचिनमध्ये १५,६३२ फूट उंचीवर कुमार पोस्टवर तैनात आहेत. या ठिकाणी दिवसा तापमान उणे २१ आणि रात्री उणे ३१ अंश सेल्सिअस आहे. यावरून येथील आव्हानांची कल्पना येऊ शकते. देशाच्या संरक्षणासाठी या ठिकाणी तैनात असलेल्या शिवा चौहान यांनी यानिमित्ताने मातृभूमीप्रति आपल्या प्रेमाला नवे परिमाण दिले आहे. फायर ॲण्ड फुरी कॉर्प्सला १४वा कॉर्प्स म्हटले जाते. नौदलाच्या ३०० अग्निवीर सैनिकांत ३४१ महिला आहेत. (वृत्तसंस्था)
खडतर प्रशिक्षण केले पूर्णभारतीय सैन्याने प्रथमच एखाद्या महिलेला या धोकादायक पोस्टवर तैनात केले आहे. फायर ॲण्ड फुरी कॉर्प्सने ट्विट केले आहे की, कॅप्टन शिवा चौहान या पोस्टवर तैनात होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. हे जगातील सर्वात उंच युद्धक्षेत्र आहे. शिवा यांनी या ठिकाणी तैनात होण्यापूर्वी अतिशय कठीण प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यात बर्फाची भिंत ओलांडणे, हिमस्खलन आणि हिमस्खलन मदत अभियान सरावाचा समावेश आहे.
- ३२0 रात्रीचे तापमान फायर ॲण्ड फुरी कॉर्प्सचे मुख्यालय लेहमध्ये आहे. ते सैन्याच्या उत्तरी कमांड अंतर्गत येते. त्यांच्या अंतर्गत होणारी नियुक्ती चीन आणि पाकिस्तानच्या सीमांवर होते. तसेच, ते सियाचिन ग्लेशियरचेही संरक्षण करतात. सध्या सियाचिनमध्ये दिवसाचे तापमान उणे २१ अंश सेल्सिअस आहे. तर, रात्रीचे तापमान उणे ३२ अंश सेल्सिअस आहे. कुमार पोस्टवर नेहमीच ३००० सैनिकांची उपस्थिती असते.
सैन्यात या महिलांची महिला जवान आणि हवाई दलात एअर वुमन म्हणून नियुक्ती होईल. - हरी कुमार, चीफ ॲडमिरल