महिला पोलीस अद्यापही बेपत्ता
By admin | Published: August 08, 2015 12:23 AM
नवी मुंबई : कामोठे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली महिला पोलीस कर्मचारी तीन दिवसांनंतरही बेपत्ता आहे. कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचे भासेल अशी चिठ्ठी असलेली बॅग व स्कुटी वाशीच्या खाडीपुलावर आढळली होती. यावरून तिने आत्महत्या केल्याची शक्यता असली तरी अद्याप त्याबाबतचा ठोस पुरावा अद्याप पोलिसांना मिळालेला नाही.
नवी मुंबई : कामोठे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली महिला पोलीस कर्मचारी तीन दिवसांनंतरही बेपत्ता आहे. कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचे भासेल अशी चिठ्ठी असलेली बॅग व स्कुटी वाशीच्या खाडीपुलावर आढळली होती. यावरून तिने आत्महत्या केल्याची शक्यता असली तरी अद्याप त्याबाबतचा ठोस पुरावा अद्याप पोलिसांना मिळालेला नाही.कामोठे पोलीस ठाण्यात नेमणूक असलेली प्राची वाघ (२६) ही महिला कर्मचारी चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेली आहे. खाडीपुलावर तिची स्कुटी व त्यावर लटकवलेली बॅग पोलिसांना आढळलेली आहे. त्यामध्ये प्राचीचे ओळखपत्र, मोबाइल व ५०० रुपयांच्या नोटेवर लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली. यावरून तिने पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याच्या संशयावरून पोलिसांनी अग्निशमन दल व मासेमारी करणार्यांच्या मदतीने खाडीच्या परिसरात तिचा शोध घेतला होता. परंतु शोध घेवूनही ती जिवंत अथवा मृत झाल्याचा कसलाही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. एप्रिल महिन्यात लग्न झालेल्या प्राचीचा सासरी वाद होत होता. तिच्या काही सवयींमुळे सासरच्यांनी घटनेच्या दोन दिवस अगोदरच तिच्या आई-वडिलांकडे तक्रार केली होती. यानंतर मंगळवारी रात्री १०.४५ वाजता तिची स्कुटी खाडीपुलावर आढळली होती. यावरून तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार वाशी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मात्र अद्याप तिचा तपास लागलेला नसल्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)