Karwa Chauth 2022: करवा चौथचं व्रत प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी खूप खास असतं. मथुरा जिल्हा कारागृहात महिला कैदी पतीच्या दीर्घायुष्यासाठी नव्हे, तर चक्क प्रियकराच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथ उपवास करणार आहेत. जिल्हा कारागृहात ३२ महिला कैद्यांनी करवा चौथचा उपवास करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांचा प्रियकरही तुरुंगात कैद आहे. करवा चौथचा उपवास ठेवून महिला कैदी प्रियकराच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणार आहे.
मथुरा जिल्हा कारागृहात अशा अनेक महिला शिक्षा भोगत आहेत की ज्यांच्या पतीविरुद्ध खूनाचा कट रचल्याचा आरोप आहे. करवा चौथचा उपवास नवऱ्यासाठी नसला तरी इथल्या महिला आपल्या प्रियकरासाठी ठेवतात. करवा चौथचा उपवास करण्याची इच्छा महिलांनी जिल्हा कारागृह अधिक्षकांकडे व्यक्त केली आहे. कारागृह अधीक्षक ब्रिजेश कुमार यांनी महिला कैद्यांची इच्छा पाहता आणि कोणतीही अडचण येऊ नये यासाठी उपजेलर शिवानी यादव यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे.
तुरुंगातील महिलांनीही पुरूष बॅरेकमध्ये बंद असलेल्या आपल्या प्रियकारांना भेटण्यासाठी तुरुंग प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. ३२ महिला कैद्यांनी करवा चौथचं व्रत ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामध्ये ९ महिला कैदी अशा आहेत की ज्यांच्यावर पतीच्या खुनाचा किंवा हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.
प्रियकर कैद्यांना भेटू देण्याची महिला कैद्यांची इच्छाकरवा चौथचा उपवास महिला कैदी ठेवणार असल्याचं डेप्युटी जेलर शिवानी यादव यांनी सांगितलं. अशा अनेक महिला आहेत ज्यांचे प्रियकर तुरुंगातील पुरुष बॅरेकमध्ये शिक्षा भोगत आहेत. या महिलांनी कारागृहाच्या आवारात आपल्या प्रियकरांना भेटण्याची इच्छाही व्यक्त केली असल्याचीही माहिती शिवानी यादव यांनी दिली.
सामाजिक संस्था उपलब्ध करुन व्रताचे साहित्यजिल्हा कारागृहात असताना करवा चौथचा उपवास करणाऱ्या महिलांसाठी एक सामाजिक संस्था शगुन आणि सुहाग साहित्य पुरवणार आहे. महिलांशी बोलल्यानंतर संघटनेनं महिला कैद्यांसाठी सुहाग साहित्य उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं आहे. करवा चौथचा उपवास करणाऱ्या ३२ पैकी २३ महिलांना पती पुरुषांच्या बॅरेकमध्ये शिक्षा भोगत आहेत. या २३ महिलांना करवा चौथच्या दिवशी तुरुंगात असलेल्या पतींना भेटण्याची सोय जिल्हा प्रशासनाने केली आहे.