शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

'महिलांनाही मशिदीत जाऊन नमाज पढू द्या'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 4:03 AM

महिलांना नमाज पढण्यासाठी मशिदींमध्ये जाऊ न देण्याची प्रथा राज्यघटनेतील समानतेच्या तत्त्वाची पायमल्ली करणारी असल्याने ती घटनाबाह्य ठरवून रद्द करावी

नवी दिल्ली : महिलांना नमाज पढण्यासाठी मशिदींमध्ये जाऊ न देण्याची प्रथा राज्यघटनेतील समानतेच्या तत्त्वाची पायमल्ली करणारी असल्याने ती घटनाबाह्य ठरवून रद्द करावी आणि मशिदी महिलांना खुल्या असल्याचे घोषित करावे, अशी विनंती करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी याचिकाकर्त्याच्या वकिलाची चांगलीच हजेरी घेतली.केंद्र सरकार, वक्फ मंडळ आणि मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाला नोटिसा काढण्यास न्या. शरद बोबडे व न्या. एस. अब्दुल नझीर यांचे खंडपीठ राजी झाले. मात्र न्या. बोबडे यांनी याचिकाकर्त्याच्या वकिलास ऐकविले की, आम्ही शबरीमला प्रकरणात दिलेल्या निकालाचा आधार घेत आहात म्हणूनच आम्ही तुमचे म्हणणे ऐकून घेतले व कदाचित यापुढेही ऐकू. परंतु तुम्ही मांडत असलेल्या मुद्द्यांनी आमचे समाधान झालेले नाही.

पुण्यात बोपोडी येथील यास्मिन व झुबेर अहमद पिरजादे दाम्पत्याने ही याचिका केली आहे. त्यांनी तेथील मोहम्मदिया जामा मशिदीत नमाजासाठी महिलांना प्रवेशाची मागणी केली. परंतु इमामांनी कळविले की, पुणे व परिसरातील मशिदींत अशी परवानगी दिली जात नाही. आम्ही दारुल ख्वाजा व दारुल उलूम देवबंद यांच्याकडे मार्गदर्शन मागविले आहे. त्यांच्याकडून खुलासा येईपर्यंत परवानगी दिली जाऊ शकत नाही.महिलांना मशिदींमध्ये मज्जाव करणे राज्यघटनेच्याच विरोधात आहे असे नाही तर ते इस्लामी धर्मशास्त्राच्याही विपरीत आहे, असा दावा करून याचिकाकर्त्यांनी त्यासाठी कुरआन व हादिथमधील दाखले दिले आहेत.पवित्र हज यात्रेतही महिलांना वेगळी वागणूक दिली जात नाही व सौदी अरबस्तानसह अन्य देशांत मशिदींमध्ये महिलांना प्रवेश आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
>समानता शासनापुरती मर्यादितन्या. बोबडे यांचे म्हणणे असे होते की, राज्यघटनेच्या अनुच्छेद १४ ला अभिप्रेत असलेली समानता शासनापुरती मर्यादित आहे. शासन व्यवहार करताना कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक द्यावी, असे बंधन आहे. मशीद, चर्च वगैरे शासनात येत नाहीत. त्यामुळे त्यांनी समानता पाळली नाही म्हणून त्याविरुद्ध न्यायालयात दाद कशी मागता येईल?न्या. बोबडे म्हणाले की, एका व्यक्तीने दुसºयास समानतेने वागविलेच पाहिजे, असा हक्क सांगून तो बजावून घेण्यासाठी न्यायालयात दाद मागता येत नाही. पण पोलीसही या कामी काही मदत करीत नाहीत, असे याचिकाकर्त्याचा वकील म्हणाला, तेव्हा न्या. बोबडे यांनी सवाल केला की, अशा प्रकरणात पोलिसांचा संबंध येतोच कुठे? मला एखादी व्यक्ती माझ्या घरात येऊ नये असे वाटत असेल तर पोलिसांची मदत घेत ती व्यक्ती जबरदस्तीने घरात घुसू शकेल का?

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMuslimमुस्लीम