स्त्रिया आता घरामध्ये आणि बाहेर दोन्ही जबाबदारी घेत आहेत. महिला सक्षमीकरणाची अनेक उदाहरणे देशाच्या अनेक भागांत दिसतात. राजस्थानातील दौसा जिल्हाही याला अपवाद नाही. आता येथे महिला स्वत:चा व्यवसाय करून महिन्याला हजारो रुपये कमावत आहेत. अशाच एक विरमा देवी आहेत. त्या दौसा जिल्ह्यातील पाडली या छोट्या गावातील रहिवासी आहेत. जिथे त्या त्यांचा व्यवसाय करत आहे आणि महिन्याला हजारो रुपये कमावत आहेत.
विरमा देवी घरकाम, शेतीची कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. पण आता त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून त्य़ा स्वतःचा व्यवसाय करत आहेत. विरमा देवी सांगतात की. सुरुवातीला त्यांना राजीविका ग्रुपच्या माध्यमातून 20-20 रुपये मिळाले. ग्रुपमध्ये सामील झाल्यानंतरच त्यांना व्यवसायाची माहिती मिळाली. नंतर गावामध्ये ग्रुपची माहिती द्यायला सुरुवात केली.
कर्ज घेऊन सुरू केला व्यवसाय
क्लस्टर मॅनेजर मंजू यांनी विरमा देवी यांना सांगितले की, त्या इतर व्यवसायही करू शकतात. पण विरमा यांच्याकडे व्यवसाय करण्यासाठी पैसे नव्हते. त्यानंतरच क्लस्टर मॅनेजरने कर्ज घेण्याचा मार्ग सुचवला. त्यानंतर विरमा देवी यांनी कर्जासाठी अर्ज केला आणि त्यांनाही कर्ज मिळाले. हे कर्ज घेऊन त्यांनी व्यवसाय सुरू केला. विरमा देवी यांनी देवतांच्या मूर्ती आणि चित्रे बनवण्याचे काम सुरू केले. विरमा देवी यांनी कर्ज घेऊन मूर्ती घडविण्याचे काम सुरू केले. यासाठी सुमारे एक लाख रुपये खर्च करण्यात आला.
दोन महिलांनाही दिला रोजगार
60 हजार रुपये किमतीचे मशीन, 30-40 हजार रुपये किमतीची चित्रे आणि मूर्ती खरेदी केल्या. आता विरमा देवी गेल्या एक वर्षापासून सतत मूर्ती बनवत आहेत. त्यामुळे महिन्याला 25 ते 30 हजार रुपयांची बचतही होत आहे. महिन्याला सात ते आठ हजार रुपये खर्च होतो. विरमा देवी यांनी त्यांच्या व्यवसायात आणखी दोन महिलांनाही रोजगार दिला. धनी देवी आणि सुनीता देवी विरमा यांच्याजवळ काम करतात आणि त्यांना व्यवसायात मदत करतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"