Coronavirus: गरिबीमुळे महिला, चिमुकल्यांवर शेत नांगरणीची वेळ; मध्य प्रदेशातील भयाण वास्तव समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 01:10 PM2021-07-12T13:10:47+5:302021-07-12T13:11:33+5:30

Coronavirus: हातावर पोट असलेल्यांची परिस्थिती फारच बिकट आणि कठीण होत चालल्याचे देशभरात पाहायला मिळत आहे.

women took place of bulls for ploughing the fields of malwa madhya pradesh | Coronavirus: गरिबीमुळे महिला, चिमुकल्यांवर शेत नांगरणीची वेळ; मध्य प्रदेशातील भयाण वास्तव समोर

Coronavirus: गरिबीमुळे महिला, चिमुकल्यांवर शेत नांगरणीची वेळ; मध्य प्रदेशातील भयाण वास्तव समोर

Next

मालवा: गतवर्षापासून भारतात कोरोनाचे संकट असून, अद्याप त्यातून मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र नाही. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग, व्यापार, व्यवसाय बंद झाले आहेत. आणखीनही त्यात भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे हातावर पोट असलेल्यांची परिस्थिती फारच बिकट आणि कठीण होत चालल्याचे देशभरात पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तर भूकबळीची समस्या निर्माण झाली आहे. मध्य प्रदेशातील मालवा भागात असेच एक भयाण वास्तव समोर आले असून, गरिबीमुळे शेत नांगरायला बैल उपलब्ध होत नसल्यामुळे आपल्या चिमुकल्यांना घेऊन महिलांवर शेत नांगरणीची वेळ आली आहे. (women took place of bulls for ploughing the fields of malwa madhya pradesh)

मध्य प्रदेशमधील मालवा येथे मन हेलावून टाकणारे दृश्य समोर आले आहे. महिलांना कायमच संघर्ष करावा, याचे हे आणखी एक उदाहरण असल्याचे बोलले जात असून, गरिबीमुळे नांगरणीसाठी बैल मिळत नसल्यामुळे नाइलाजाने महिलांनाच नांगर हातात घेऊन शेतीची कामे करावी लागत आहेत. महिलांच्या या परिस्थितीला जबाबदार कोण असल्याची विचारणा केली जात आहे. विशेष बाब म्हणजे मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात ११ महिलांना स्थान देण्यात आले आहे. 

चिमुकल्यांसोबत महिला करतायेत शेतीची कामे

अत्यंत गरिबी आणि हलाखीच्या परिस्थितीमुळे आगर-मालवा येथील एका कुटुंबाकडे शेतीची कामे करण्यासाठी बैल घेण्याइतपतही पैसै नाहीत. शेती केली नाही, तर दोनवेळच्या अन्नाचीही सोय होणार नाही. त्यामुळे शेवटी नाइलाजास्तव महिलांना आपल्या चिमुकल्या मुलांना सोबत घेऊन शेतीची कामे करावी लागत आहेत. मुलांच्या हातात ज्या वयात पुस्तके असणे अपेक्षित आहे, तेच चिमुकले हात नांगर हातात घेऊन आईला मदत करताना पाहायला मिळत आहे. 

अन्यथा पीक येणार नाही

हातावर हात धरून बसून राहिले, तर पीक येणार नाही. यामुळे शेवटी महिलांनी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, हे चित्र सरकारी यंत्रणेसमोर आव्हान असल्याचे सांगितले जात आहे. कारण सरकारच्या अनेक योजना लालफितीच्या कारभारात कशा अडकून पडल्या आहेत, याचे हे उत्तम उदाहरण असल्याचा संताप यानिमित्ताने व्यक्त केला जात आहे. 
 

Web Title: women took place of bulls for ploughing the fields of malwa madhya pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.