नाशिक- १२२ व्या वर्धापनदिनाचं औचित्य साधून पंजाब नॅशनल बँकेने नाशिकमधील पूर्णत: महिला शाखा- इंदिरानगर आणि पिंपळगाव बसवंत अशा दोन शाखा कार्यान्वित केल्या आहेत.पंजाब नॅशनल बँकेच्या सी.ई.ओ उषा सुब्रम्हण्यम यांच्या ध्येय धोरणानुसार महिलांचे सशक्तीकरण अभियानांतर्गत बँकींग क्षेत्रात महिलांनी पुढे यावे यासाठी उद्यम निधी स्किम, पी.एन.बी.महिला समृद्धी योजना, पी.एन.बी.महिला कल्याणी कार्ड योजना अशा अनेक योजना पंजाब नॅशनल बँक राबवित आहे.इंदिरानगर शाखेचा शुभारंभ बँकेचे फिल्ड महाव्यवस्थापक, पिम (मुंबई) एस.के.वाधवा यांचे हस्ते प्रमुख पाहुणे अपूर्वा जाखडी, डॉ. अर्पणा जाखडी, डॉ. अर्पणा फरांदे, डॉ. श्रीया कुलकर्णी, चंद्रप्रकाश सागाळ यांच्या उपस्थितीत सोमवार दि.१३ रोजी झाला. ही शाखा पूर्णत: महिला नेतृत्वाखाली असल्याची माहिती व्यवस्थापिका भारती राजे यांनी दिली. तसेच या शाखेबरोबरच पिंपळगाव बसवंत शाखेचाही शुभारंभ याच दिवशी फिल्ड महाव्यवस्थापक एस.के.वाघवा यांचे हस्ते झाला. पिंपळगाव शाखा उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कांदा मर्चंटस असोसिएशनचे अध्यक्ष मोहनलाल शाह, पिंपळगाव मर्चंटस् बँकेच्या चेअरमन सौ. सुनंदा जैन, पुणे मंडल प्रमुख चंद्रप्रकाश आगाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाल्याची माहिती पिंपळगाव शाखेचे व्यवस्थापक परेश मांडाणी यांनी दिली. (वा.प्र.)--
पंजाब नॅशनल बँकेची नाशकात महिला शाखा
By admin | Published: April 15, 2016 1:54 AM