नवी दिल्ली : दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या (आप) सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या वचनाची पूर्तता करीत कुठल्याही कंत्राटी कर्मचाऱ्यास नोकरीतून काढून टाकण्याच्या प्रक्रियेवर निर्बंध घातले आहेत. या निर्णयामुळे सुमारे एक लाख कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. दिल्ली सरकारचे विविध विभाग व संस्थांद्वारे कंत्राटावर राबविण्यात येणाऱ्या योजनांत डॉक्टर्स, परिचारिका, शिक्षक, स्वच्छता कर्मचारी यांच्यासह सुमारे एक लाख कर्मचारी कार्यरत आहेत. पुढील आदेशापर्यंत कुठल्याही कंत्राटी कर्मचाऱ्याची सेवा बडतर्फ अथवा थांबविण्यात येऊ नये, असे जारी आदेशात म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
‘आप’ने पाळले वचन
By admin | Published: February 18, 2015 1:33 AM