दगडफेक करणार्या संशयितांच्या जामिनावर कामकाज
By admin | Published: July 12, 2016 12:10 AM
जळगाव : गोलाणी मार्केटमध्ये दगडफेक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ातील १२ संशयित आरोपींनी जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर सोमवारी जिल्हा न्यायालयात कामकाज झाले.
जळगाव : गोलाणी मार्केटमध्ये दगडफेक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ातील १२ संशयित आरोपींनी जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर सोमवारी जिल्हा न्यायालयात कामकाज झाले.गोलाणी मार्केटमध्ये घुसून दगडफेक करीत दुकानांमधील साहित्यासह फलकांची नासधूस केल्याने संशयित आरोपी मोहंमद बिलाल मोहंमद फारूख बागवान, वसीम खान अब्दुल खान, इम्रान अब्दूल खान, मोहसीन शब्बीर बागवान, सैयद कलीम जवरअली, दानेश नासीर हुसेन, अमीर अली मोहंमद अली, मोहंमद जुबेर अब्दूल रहीम खाटीक, शेख जाकीर शेख शकील, ऐनोद्दीन अमिनोद्दीन शेख, सलमान सलीम खान व अल्तमश गुलाम रसूल खाटीक (सर्व रा.जळगाव) यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या सर्व संशयितांनी जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर सोमवारी न्यायाधीश ए.के. पटणी यांच्या न्यायालयात कामकाज झाले. त्यात दोन्ही पक्षांच्यावतीने युक्तिवाद करण्यात आला. याप्रकरणी १३ जुलै रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे. सरकारतर्फे ॲड.केतन ढाके तर संशयितांतर्फे ॲड.अकील इस्माइल, ॲड.शरीफ पटेल, ॲड.अजय सिसोदिया कामकाज पाहत आहेत.