शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘वर्क फ्रॉम होम’मुळे कुटुंबांमध्ये वाढला तणाव, IIT मधील तज्ज्ञांच्या अभ्यासातून स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 05:56 IST

कोरोना महामारीच्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ हा शब्द परवलीचा बनला होता. आता देशातील कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आला तरी अनेक उद्योगांनी घरून काम करण्याची पद्धत सुरूच ठेवली आहे.

नवी दिल्ली :

कोरोना महामारीच्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ हा शब्द परवलीचा बनला होता. आता देशातील कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आला तरी अनेक उद्योगांनी घरून काम करण्याची पद्धत सुरूच ठेवली आहे. उद्योगांना ही पद्धत सोयीची वाटते; परंतु यामुळे कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक जीवनावर वाईट परिणाम झाल्याचे दिसत असून त्यांच्यात नैराश्य वाढू लागले आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मद्रास आणि भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) अमृतसर येथील तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासातून हे दाखवून दिले आहे. हा अभ्यास ‘एम्प्लॉई रिलेशन्स’ या प्रख्यात नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. यावर उपाय काय? कर्मचाऱ्यांवर नकारात्मक परिणाम होऊ नये, यासाठी ‘कर्मचारी समस्या - केंद्रित धोरण’ गरजेचे आहे. त्यानुसार नियोजन करून उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय तसेच मित्रांपर्यंत सक्रियपणे पोहोचणे गरजेचे आहे.

कोणता अभ्यास केला?- ‘वर्क फ्रॉम होम’मुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यालय आणि कुटुंब यातील सीमामर्यादांचे उल्लंघन झाले आहे का? - ही संकल्पना फलदायी किंवा अपयशी ठरण्यात स्त्री-पुरुष भेद भूमिका बजावतो का? - ही पद्धत मोठ्या नोकरदारांनी कोरोनानंतरही चालू ठेवल्यामुळे अनेक कर्मचारी नाखूश आहेत.- यामुळे विवाहितांमध्ये मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झाला. त्यांच्या नात्यात नवीन गुंतागुंत निर्माण झाली.संशोधनात नेमके काय?- ‘वर्क फ्रॉम होम’मुळे कौटुंबिक जीवनावर नकारात्मक परिणाम. कार्यालयीन कामांनाही फटका बसला आहे.- कर्मचाऱ्यांमध्ये आपण एक अपयशी पालक, अयशस्वी व्यावसायिक आहोत, अशी भावना बळावू लागली आहे. - भारतात पारंपरिक स्त्री-पुरुष भेदामुळे कुटुंबांमध्येही आणखी तणाव निर्माण झाला आहे.