लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम कंपन्यांच्या कामकाजावर होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक कंपन्या कोरोना रुग्ण वाढत असल्याने पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होम सुरू करत आहेत, तसेच रोजगाराच्या क्षेत्रात ‘कुठूनही काम’ हा नवीन कल प्रभावी राहणार असून त्याचा दुसऱ्या श्रेणीतील (टिअर-२) शहरांना सर्वाधिक लाभ मिळेल, असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे..
गेल्या आठवड्यात फार्मा कंपनी सिल्पाने सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. जोपर्यंत कोरोना रुग्ण कमी होत नाहीत तोपर्यंत तोपर्यंत वर्क फ्रॉम होम सुरू ठेवण्यात येईल. आयसीआयसीआय कंपनीनेही डिसेंबरमध्येच या प्रकारचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
महिंद्रा अँड महिंद्रा म्युच्युअल फंडने आठवड्यातून तीन दिवस ऑफिस आणि तीन दिवस घरातून काम करण्याचे नियम लागू केले आहेत. महाराष्ट्रामध्ये सध्या सरकारी आणि खासगी कंपन्यांना ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचे आदेश देण्यात आले आहेत.
खासगी कंपन्या पूर्णपणे वर्क फ्रॉम होमसाठी आग्रह करू लागल्या आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर जेव्हा पुन्हा कार्यालये सुरू करण्यात आली त्यावेळी दुसऱ्या लाटेमुळे ती लगेच बंद करावी लागली. हीच स्थिती सध्या आहे. डिसेंबरमध्ये कार्यालये सुरू होताच आता साथ वाढल्याने ती पुन्हा बंद करण्याचा अनेक कंपन्यांचा कल आहे.
कंपन्या हाय अलर्टवरआरपीजी ग्रुप, डाबर इंडिया, मॅरिको, फ्लिपकार्ट, पालरे, मेकमायट्रिपसारख्या कंपन्यांनी हाय अलर्ट जारी केला असून, पुढील दोन किंवा तीन महिने वर्क फ्रॉम होम लागू केले आहे. अनेक तंत्रज्ञान कंपन्या ऑफिस चालू करण्याच्या मन:स्थितीत नाहीत.वेतनाच्या बाबतीत अहमदाबाद, चंदीगढ, तिरुवनंतपूरम, भुवनेश्वर, नागपूर, इंदौर, जयपूर आणि बडोदा यांसारखी दुसऱ्या श्रेणीतील शहरे टॉप-१० यादीत अग्रस्थानी आहेत, असे रँडस्टॅड इंडियाने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.
मुंबईत मिळते सर्वाधिक वेतनप्रथम श्रेणीच्या शहरांत कनिष्ठ (६.७ लाख रुपये) मध्यम (१८.१ लाख रुपये) पातळीवरील कर्मचाऱ्यांच्या वेतनात बंगळुरू सर्वोच्च स्थानी.