सेंथीलकुमारच्या जामिनावर १८ रोजी कामकाज
By admin | Published: March 11, 2016 10:25 PM
जळगाव : केटामाइन प्रकरणातील आरोपी एस.एम. सेंथीलकुमार याने न्यायालयात जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर १८ मार्च रोजी कामकाज होणार आहे.
जळगाव : केटामाइन प्रकरणातील आरोपी एस.एम. सेंथीलकुमार याने न्यायालयात जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर १८ मार्च रोजी कामकाज होणार आहे.सेंथीलकुमार याने न्यायाधीश के.बी. अग्रवाल यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर शुक्रवारी कामकाज होऊ शकले नाही. त्यासाठी १८ मार्च ही तारीख निित करण्यात आली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड.संभाजी जाधव तर आरोपीतर्फे ॲड.विजय दर्जी व ॲड.आशा रसाळ हे काम पाहत आहेत.