नवी दिल्ली : दहशतवादी आणि हिंसेला सामोरे जाणाऱ्या जगात राष्टÑपिता महात्मा गांधी यांचे अहिंसेचे तत्त्व प्रासंगिक आहे, असे प्रतिपादन राष्टÑपती रामनाथ कोविंद यांनी केले. संयुक्त राष्टÑ आणि बहुस्तरीय आंतरराष्टÑीय संस्थांच्या माध्यमातून गांधी जयंती साजरी करून हा जागतिक सोहळा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.२ आॅक्टोबर २०१८ ते २०२० पर्यंत महात्मा गांधी जयंतीउत्सव कशी साजरी करावी, याचे नियोजन करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या राष्टÑीय समितीच्या पहिल्या बैठकीला उपराष्टÑपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, माजी पंतप्रधान डॉ़ मनमोहनसिंग, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, २१ राज्यांचे मुख्यमंत्री, चीनचे विद्वान क्युयायू शांग आणि बर्नी मेयर यांची उपस्थिती होती. भारतातील ११६ जणांसह या समितीचे एकूण १२५ सदस्य आहेत.गांधी जयंती साजरी करण्यासाठी महत्त्वपूर्ण रचनात्मक सूचना, शिफारशी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समितीच्या सदस्यांना धन्यवाद दिले.कार्यांजली या विषयसूत्रानुसार कार्यक्रम आखले जावेत, यावर पंतप्रधानांनी भर दिला. महात्मागांधी आणि त्यांची शिकवणचिरंतन आहे. जयंती साजरी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा. जेणेकरून अवघे जगदखल घेऊन यात सहभागी होईल, असेही ते म्हणाले.
गांधी जयंती व्हावा जागतिक उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 4:57 AM