शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

विश्व संस्कृती महोत्सव वादाच्या भोवऱ्यात

By admin | Published: March 07, 2016 11:10 PM

प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट आॅफ लिव्हिंग या संस्थेतर्फे येथील यमुना नदीच्या किनारी येत्या ११ मार्चला आयोजित विश्व संस्कृती महोत्सवावरील वादावर आज

नवी दिल्ली: प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट आॅफ लिव्हिंग या संस्थेतर्फे येथील यमुना नदीच्या किनारी येत्या ११ मार्चला आयोजित विश्व संस्कृती महोत्सवावरील वादावर आज मंगळवारी राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी) आपला निर्णय देणार आहे. परंतु तत्पूर्वी संस्थेला आणखी एक धक्का बसला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपती उपस्थित राहणार नाहीत. या कार्यक्रमासाठी ३५ लाख लोकांच्या येथे येण्याने नदीच्या पर्यावरणावर सुमारे २ लाख १० हजार टन एवढा भार पडणार आहे. त्यामुळे आम्ही पर्यावरण लवादाकडे हा कार्यक्रम रद्द करण्याची याचिका केली असल्याचे पर्यावरण कार्यकर्ते आनंद आर्य यांनी सांगितले. श्री श्री रविशंकर यांनी मात्र यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. ज्या कामासाठी पुरस्कार मिळायला हवा होता त्यासाठी आम्हाला न्यायालयात खेचण्यात येत आहे. कार्यक्रम संपल्यावर संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचे आश्वासन आम्ही दिले असून ते पूर्ण करू, असेही श्री श्रींनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)