शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Coronavirus: भारतातील रुग्णांचा आकडा अमेरिका, चीनपेक्षा कमी, पण...; WHOच्या आकडेवारीनं चिंतेत भर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 1:14 PM

भारतात आतापर्यंत एक लाख ७१ हजार जणांची कोरोनाची तपासणी झाली असून त्यापैकी ८,४५३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

नवी दिल्ली: संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. चीनमधून पसरलेल्या कोरोनाने जगभरातील 200हून अधिक देशांमध्ये थैमान घातलं आहे. भारतातही गेल्या २४ तासांत १,०३५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने देशातील एकूण बाधितांची संख्या ८ हजार ४५३ च्या घरात गेली आहे. तसेच कोरोनामुळे आतापर्यत देशात २९० लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात १४ एप्रिलपर्यत लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. तसेच देशात १४ एप्रिलनंतर अजून दोन आठवडे लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु आता जागतिक आरोग्य संस्थेने एक अहवाल सादर केला आहे. या अहवालानूसार भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी आहे. मात्र अमेरिका, चीन, जर्मनी या देशांपेक्षाही भारताचं कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूदराचं प्रमाण जास्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. या दाव्याने देशभरात चिंतेचे वातवरण निर्माण झाले आहे.

WHOच्या अहवालानूसार, भारतात आतापर्यंत एक लाख ७१ हजार जणांची कोरोनाची तपासणी झाली असून त्यापैकी ८,४५३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत भारतात कोरोनामुळे २९० जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु  अमेरिकेत जेव्हा ७९८७ जणांना करोनाची लागण झाली होती तेव्हा १०० जणांचा मृत्यू झाला होता.  त्याचप्रमाणे कोरोनाचा केंद्रबिंदू असलेल्या चीनमध्ये पहिल्या ७७३६ कोरोना रूग्णांपैकी १७० जणांचा मृत्यू झाला होता.

भारतात ८४५३ कोरोना रूग्णांपैकी २९० जणांचा मृत्यू झाला आहे. याच आधारावर भाराताचा मृत्यूदर ३.२१ टक्के इतका आहे. दुसरीकडे अमेरिकेत ज्यावेळी ७०८७ जणांना कोरोनाची लागण झाली तेव्हा १०० जणांचा मृत्यू झाला होता. त्यानुसार अमेरिकेचा मृत्यूदर १.४१ टक्के असा होतो. तसेच चीनमध्ये देखील जेव्हा ७००० हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती तेव्हा चीनचा या आकड्यांनूसार मृत्यूदर २.२ टक्के असा होता. जर्मनीमध्ये ज्यावेळी ७१५६ कोरोनाचे रूग्ण झाले तेव्हा फक्त १३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे जर्मनीचा मृत्यूदर ०.१८ टक्के होता.

दरम्यान, जगातील २११ देशांमध्ये आतापर्यंत १७ लाख, ३५ हजार रुग्ण आढळून आले, त्यापैकी १२ लाख, ३० हजार जणांवर सध्या उपचार सुरू असून त्यापैकी ५० हजार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र, सुमारे ४ लाख रुग्ण या आजारातून बचावलेही आहेत. अमेरिकेमध्ये रुग्णांची संख्या ५ लाख, ३ हजारांवर गेली आहे. अमेरिकेखालोखाल इटलीमध्ये १८ हजार, ९०० जण कोरोनामुळे मरण पावले आहेत आणि स्पेनमध्ये मृतांचा आकडा १६ हजार, ५०० वर गेला आहे. फ्रान्समध्ये कोरोनाने १३ हजार, २०० जणांचा तर ब्रिटनमध्ये ९ हजारांहून अधिक रुग्णांची बळी घेतला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतAmericaअमेरिकाchinaचीनWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाDeathमृत्यू