पाच वर्षांपर्यंत मुलांना पोलिओ ड्रॉप देणे आवश्यक असते, हे सर्वच पालकांना माहिती आहे. मात्र यासंदर्भातील काही प्रश्नांमुळे ते संभ्रमात असतात. आई-वडिलांची हीच समस्या दूर करण्यासाठी 24 ऑक्टोबरला जागतिक पोलिओ दिवस साजरा केला जातो. मुलांना पोलिओ डोस देणे का आवश्यक आहे, हे जाणून घेऊया
1. पोलिओ ड्रॉप म्हणजे काय असते?पोलिओ हा व्हायरल इंफेक्शनमुळे होणारा असा आजार आहे, जो ठीक होत नाही. या संसर्गापासून आपल्या मुलांचं रक्षण व्हावं यासाठी मुलांना पोलिओचा डोस द्यावा. या आजाराचा व्हायरस लहान मुलांमध्ये अधिक प्रमाणात पसरतो.
2. कोणत्या वयात द्यावा पोलिओ ड्रॉप? नवजात बाळापासून ते 5 वर्ष वयोगटातील मुलांना पोलिओचा डोस देण्यात यावा. वेळेनुसार आणि न चुकता हा डोस मुलांना द्यावा. निष्काळजीपणा करू नये. या डोसमुळे तुमच्या मुलांच्या आयुष्याचे गंभीर आजारापासून संरक्षण केले जाते. त्यामुळे अगदी नियमानं पोलिओ डोस द्यावा.
3. शरीरावर कसा होऊ शकतो परिणाम?पोलिओचा व्हायरस स्नायूंना कमकुवत बनवतो, यामुळे मुलांच्या अवयवांची हालचाल होत नाही. अधिकतर मुलांचे पाय आणि डोक्यातील स्नायूवर व्हायरस आक्रमण करतो. पोलिओमध्ये मुलांना डोकेदुखी, हात-पाय दुखण्याचा त्रास होतो. 70 टक्के प्रकरणांमध्ये पोलिओची लक्षण दिसून येत नाहीत आणि हा आजार केवळ पोलिओ इंजेक्शनमुळेच दूर होऊ शकतो.
4. पोलिओ ड्रॉपमुळे संपूर्ण संरक्षण मिळणार?हो, पोलिसाचा एक ड्रॉप मुलांना पोलिओचा संसर्ग होण्यापासून संरक्षण करतो. पोलिओपासून मुलांचा बचाव करण्यासाठी ओरल पोलियो वॅक्सिन दिले जाते, यामुळे बाळ पोलिओपासून पूर्णतः सुरक्षित राहते.
5. जुलाब-उलट्यांचा त्रास झाल्यास ड्रॉप पाजावा?मुलांना ताप, उलट्या, जुलाबाचा त्रास होत असल्यास पोलिओचा ड्रॉप पाजावा की नाही?,असा प्रश्न अनेक पालकांना पडतो. तर पालकांनो घाबरुन न जाता आपल्या पाल्याला पोलिओचा डोस पाजावा. कोणत्याही परिस्थितीत मुलांना पोलिओचा डोस देता येतो.
6. नवजात बाळाला पोलिओचा डोस पाजावा का?नवजात बाळासाठीही पोलिओचा डोस आवश्यक आहे. नवजात बाळाला पोलिओचा डोस पाजल्यास कोणतेही दुष्पपरिणाम होत नाहीत.
7. पोलिओ लसीकरण कसे करावे?मुलाच्या जन्मानंतर सहाव्या, दहाव्या आणि चौदाव्या आठवड्यात लसीकरण करावे. 16 ते 24 महिन्याच्या बाळाला बूस्टर डोस द्यावा. याव्यतिरिक्त जेव्हाही सरकारद्वारे पोलिओ अभियान चालवण्यात येईल, त्यावेळेसही हा ड्रॉप नक्की पाजावा.