नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: योगासने आणि सूर्यनमस्कार करुन शारिरीक तंदुरुस्त जपतात. मोदींच्या प्रयत्नातूनच जगभरात भारतीय योगाभ्यास आणि योगासने पोहोचली. त्यामुळेच, जागतिक योग दिनही साजरा होऊ लागला. भारतीय संस्कृती आणि परंपरेत योगासने आणि योगविद्येला अधिक महत्त्व आहे. त्यात, सूर्यनमस्काराचेही विशेष महत्व आहे. याच सूर्यनमस्काराच्या सामूहिक कृतीतून गुजरातने आज गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये आपलं नावं केलंय. एकाचवेळी १०८ ठिकाणी हा सूर्यनमस्कार घालण्यात आला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हा विक्रम गुजरातने केला आहे.
गुजरातमध्ये सर्वाधिक लोकांनी एकाच वेळी १०८ ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा जागतिक विक्रम केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे अभिनंदन केले. सूर्यनमस्काराचे नानाविध फायदे असल्यामुळे प्रत्येकाने सूर्यनमस्काराला आपल्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवावा, असे आवाहनही मोदींनी केले.