शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
3
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
4
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
5
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
6
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
7
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
8
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
9
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
10
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
11
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
12
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
13
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
14
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
15
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
16
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
17
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
18
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
19
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
20
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'

भारतात इसिससाठी भरती करणारा अमेरिकेकडून जागतिक दहशतवादी घोषित

By admin | Published: June 16, 2017 10:05 AM

भारतामध्ये इसिससाठी भरती करणाऱ्या मोहम्मद शफी अरमारला अमेरिकेने जागतिक दहशतवादी घोषित केलं आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 16-  भारतामध्ये इसिससाठी भरती करणाऱ्या मोहम्मद शफी अरमारला अमेरिकेने जागतिक दहशतवादी घोषित केलं आहे. युसुफ-अल हिंदी या नावाने मोहम्मद सोशल साइट्सवर वावरत होता. भारतातमध्ये गेल्या तीन वर्षात मोहम्मदने इसिसचे गट तयार केल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. जुनूद-अल खलिफा-ए-हिंद हा गटसुद्धा मोहम्मदने स्थापित केला असून त्यामध्ये 50 भारतीय मुलांना त्याने सहभागी करून घेतलं आहे. द टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने मोहम्मद शफी अरमार, ओसामा अहमद अतार आणि मोहम्मद ईसा युसूफ साकर अल बिनाली या तिघांनाही जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत टाकलं आहे तसंच त्यांच्यावर प्रतिबंध लावले जाणार आहे. 
शफी हा भारतातमध्ये इसिस संघटना स्थापन करण्यासाठी जबाबदार आहे. तसंच इसिसचा म्होरक्या अबू बकर अल-बगदादी आणि त्याच्या निकटवर्तियांपैकी शफी एक आहे. अमेरिकेच्या या घोषणेमुळे फक्त इसिसच्या  भारतातातील प्रमुखाची ओळखच नाही झाली तर त्याच्या सीरियामध्ये त्यांच्या मृत्यूविषयी जी अफवा होती तीसुद्धा स्पष्ट झाली आहे. 
 
मोहम्मद शफी अरमारचं नाव 2011मध्ये दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या रडारवर पहिल्यांदा आलं होतं. त्यावेळी शफी अरमार आणि त्याचा भाऊ सुल्तान इंडियन मुजाहिदीनमध्ये होते आणि ते पाकिस्तानात राहत होते. पोलिसांच्या स्पेशल सेलने 2011मध्ये दरभंगामधून इंडियन मुजाहिदीनचे काही दहशतवादी पकडले होते. या कारवाईत मोहम्मद कतील सिद्दीकीला सगळ्यात पहिल्यांदा अटक झाली होती. त्याची 2012मध्ये पुण्याच्या येरवडा जेलमध्ये हत्या करण्यात आली. यानंतर स्पेशल सेलने 54/2011 अंतर्गत एफआयआऱ दाखल केली होती. स्पेशल सेलच्या कारवाईत अटक केलेल्या या दहशतवाद्यांकडूनच पोलिसांना मोहम्मद शफी अरमारबद्दल माहिती मिळाली होती. त्यावेळी शफी सोशल मीडियावर तरूणांचं ब्रेनवॉश करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.  शफी अरमार त्यावेळी दहशतवाद्यांचा मोठा चेहरा होता. 
 
एनआयएने  गेल्यावर्षी केलेल्या कारवाईत जुनूद-अल खलिफा-ए-हिंदमध्ये भरती झालेल्या 23 जणांना अटक केली होती.  शफी अरमारला ग्लोबर टेररिस्ट घोषित करावं अशी मागणी भारताने युनायटेड स्टेट्स आणि युनायटेड नेशन्सकडे केली होती. शफी अरमर फेसबुक आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून 600 ते 700 भारतीय तरूणांच्या संपर्कात होता, असा संशय व्यक्त केला जातो आहे. भारतातील इसिसच्या संघटनेसाठी त्याने हवालामार्फत पैसा जमवला होता असंही बोललं जातं आहे.