शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

गुजरातेत विश्वविक्रमी ‘योग’!

By admin | Published: June 22, 2016 3:00 AM

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मंगळवारी गुजरातच्या राजकोटमध्ये सुमारे १६०० गर्भवती महिलांनी योगासने करून नवा विश्वविक्रम स्थापित केला.

अहमदाबाद : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मंगळवारी गुजरातच्या राजकोटमध्ये सुमारे १६०० गर्भवती महिलांनी योगासने करून नवा विश्वविक्रम स्थापित केला. तर राज्यभरात ४०,००० ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमध्ये सव्वा कोटी लोकांनी सहभाग घेतला.मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल म्हणाल्या, १६०० गर्भवती महिलांच्या विश्वविक्रमासोबतच ८,००० मुलांनी राजकोटमधील पटांगणावर मानवी शृंखला तयार करून आणखी एक जागतिक विक्रम केला आहे. राजकोटचे जिल्हाधिकारी विक्रांत पांडे यांच्या सांगण्यानुसार या कार्यक्रमात १६०० गर्भवती महिला सहभागी झाल्या होत्या. यापूर्वी चीनने केलेला विक्रम मोडला असल्याचा दावा त्यांनी केला. चीनमध्ये ९१३ गर्भवती महिलांनी योगासने करून विक्रम स्थापित केला होता. या कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यात आले असून गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डच्या ज्युरींना ते पाठविण्यात येणार आहे. या दरम्यान आपत्कालीन स्थितीचा सामना करण्याकरिता १८ स्त्री रोगतज्ज्ञ, डॉक्टरांचे पथक व १०८ रुग्णवाहिका सज्ज होत्या. (वृत्तसंस्था)योग ही भारताची देणगी - बान की मून संयुक्त राष्ट्र : सद्भावनेला चालना देणे हा योगाचा संदेश आहे, असे सांगतानाच वर्णभेद, लिंगभेद याच्याबाहेर जाऊन एकतेचा संकल्प करा, असे आवाहन संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून यांनी केले. आरोग्यपूर्व जीवनशैलीचा अवलंब करा, एकतेचा संकल्प करा. वर्णभेद आणि लिंगभेद बाजूला सारून समानतेचे आवाहन त्यांनी केले. बान की मून यांचे विशेष सल्लागार विजय नाम्बियार यांनी हा संदेश वाचून दाखविला. ते म्हणाले आहे की, योग ही प्राचीन शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक क्रिया भारताची देणगी असून, आता संपूर्ण जगात त्याचा अंगीकार केला जात आहे.नवी दिल्लीत सशस्त्र दलाची सागरी योगासनेसशस्त्र दलांनी दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनी देशभरात विविध ठिकाणांसह समुद्रात युद्धनौकांवर योगासने करून आपला सहभाग नोंदविला. नौदल आणि सागरी सीमा सुरक्षा दलातर्फे (कोस्टल गार्ड) आयएनएस ऐरावत, विराट आणि आयसीजीएस सागरवर योगभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय अंदमान निकोबार बेटांसारख्या पर्वतीय भागातही सेनेने योगदिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. लष्कर प्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग, वायुदल प्रमुख अरूप राहा आणि कोस्टल गार्डचे महासंचालक राजेंद्रसिंग हे सुद्धा योगाभ्यासात सहभागी झाले होते. चंदीगडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शनेराज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी योग दिन समारंभाविरोधात निदर्शने दिली. या कार्यक्रमाला मोदी उपस्थित होते. आम्ही योगाविरुद्ध नाही तर मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध आंदोलन करीत होतो, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. संस्कृत श्लोकाला केरळमध्ये आक्षेपतिरुअनंतपुरम : केरळच्या आरोग्य मंत्री आणि माकपाच्या ज्येष्ठ नेत्या के.के. शैलजा यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शासकीय समारंभात संस्कृत श्लोक समाविष्ट करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून नव्या वादाला तोंड फोडले.सेंट्रल स्टेडियममध्ये आयोजित राज्यस्तरीय योग दिन कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. त्यांनी अधिकाऱ्यांना श्लोक म्हणणे आवश्यक होते काय? असा प्रश्न केला. भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. योगाभ्यास सुरू करण्यापूर्वी प्रत्येक धार्मिक समुदायाचे लोक आपली प्रार्थना म्हणू शकतात. कुठल्याही धर्मावर विश्वास नसलेल्या लोकांचीही एकाग्रतेची आपली पद्धत असते, असे शैलजा यांचे म्हणणे होते. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपाने टीका केली.