- विभाष झापाटणा : अयोध्येत राममंदिर उभारणीचे काम सुरू केल्यानंतर आता बिहारमध्ये रामायण विद्यापीठाची स्थापना होत आहे. त्यासाठी माजी आयपीएस अधिकारी व महावीर मंदिर न्यासाचे आचार्य किशोर कुणाल यांनी पुढाकार घेतला आहे.या विद्यापीठात वाल्मिकी रामायणाला केंद्रस्थानी ठेवून संशोधन केले जाणार आहे. दोन वर्षांच्या आत अध्ययनही सुरू होणार आहे. वैशाली जिल्ह्यात इस्लामपूरमध्ये महावीर मंदिराची १२ एकर जागा रामायण विद्यापीठासाठी निश्चित करण्यात आली आहे. विद्यापीठात काय?प्रस्तावित रामायण विद्यापीठात एक समृद्ध ग्रंथालय असेल.येथे गीता, रामायण, महाभारत, वेद व पुराण आदींवर संशोधन केले जाईल.ज्योतिष, कर्मकांड, आयुर्वेद, योग आणि प्रवचन या पाच प्रमुख विषयांचे अध्ययन येथे होईल.या माध्यमातून विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू शकतील.असा असेल अभ्यासक्रमविद्यापीठात संस्कृत व्याकरणाच्या अभ्यासावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.पदवी स्तरावर शास्त्री, पदव्युत्तर स्तरावर आचार्य, पीएचडीच्या स्वरूपात विद्यावारिधी आणि डी-लिटच्या उपाधीसाठी विद्या वाचस्पती उपाधी देण्यात येईल.रामायण शिरोमणी या पदविका अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्ष असेल. तर, सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम करणाऱ्यास रामायण पंडित नावाने ओळखले जाईल.
बिहारमध्ये उभारणार रामायण विद्यापीठ; वैशाली जिल्ह्यात १२ एकरावर इमारत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 8:03 AM