ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा संपूर्ण देशावर परिणाम झाला. पण वाईट अजून घडायचे आहे. नोटाबंदीमुळे देशाचे नुकसान झाले आहे. परिस्थिती बिघडून खराब झाली पण त्यापेक्षा पण अजून वाईट घडायचे आहे अशा शब्दात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली.
नोटाबंदीचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल हे मी संसदेत बोललोच होते. काही रेटींग एजन्सींनी विकास दराचा आकडा 6.6 टक्क्यापर्यंत घसरण्याचा अंदाज वर्तवला आहे असे मनमोहन सिंग म्हणाले.
पंतप्रधान मोदी नेहमी अर्थव्यवस्था बदलण्याचा दावा करतात पण त्यांचे दावे फसवे आहेत. मनमोहन सिंग काँग्रेसच्या जनवेदना मेळाव्यात बोलत होते.