गुवाहाटी : संपूर्ण जग कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असताना अंधश्रद्धेचा पगडा असलेले लोक मात्र हा दैवी कोप असल्याचे मानत असून आसाममध्ये तर ‘कोरोना देवी’ला प्रसन्न करण्यासाठी अनेक ठिकाणी तिची पूजा करण्यासही सुरुवात केली आहे. आसामच्या विश्वनाथ जिल्ह्यात व राजधानी गुवाहाटीमध्येही काही ठिकाणी महिलांनी गेल्या दोन दिवसांत नदीकाठी जाऊन अशा पूजा केल्याचे वृत्त आहे. देवी, कांजिण्या व गोवर यासारखे साथीचे आजार दैवी कोपामुळे होतात, असा भारतीय समाजात फार पूर्वीपासून समजआहे.
‘कोरोना देवी’ची आसाममध्ये पूजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 06:08 IST