रोहतक (हरियाणा) : ‘भारत माता की जय’उद्घोषावरून निर्माण झालेल्या वादात आता योगगुरू रामदेवबाबा यांनीही उडी घेतली आहे. मी या देशाचा कायदा आणि राज्यघटनेचा आदर करतो अन्यथा ‘भारत माता की जय’ला विरोध करणाऱ्या लाखो लोकांचा शिरच्छेद केला असता असे वादग्रस्त विधान रामदेवबाबांनी केले आहे.भारत माता की जय म्हणणे देश आणि मातृभूमीप्रती नागरिकांच्या निष्ठेचे प्रतीक आहे. अशात एखादा धर्म याला विरोध करीत असल्यास ते देशहिताचे नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.रविवारी येथे सद्भावना संमेलनात मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, या उद्घोषाचा संबंध धर्माशी नव्हेतर मायभूमीशी आहे आणि एखादा धर्म आपल्या मायभूमीचा गौरव करण्याची परवानगी देत नसेल तो धर्म देशहिताचा नाही. यासंदर्भात एआयएमआयएमचे नेते असदुद्दिन ओवेसी यांचा नामोल्लेख न करता रामदेवबाबांनी त्यांच्यावर जोरदार प्रहार केला. माझ्या मानेवर चाकू ठेवला तरीही मी भारत माता की जय म्हणणार नाही, असे ओवेसी यांनी स्पष्ट केले होते.
...तर लाखो लोकांचा शिरच्छेद केला असता
By admin | Published: April 05, 2016 12:12 AM