शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

...त्यापेक्षा मरणं पसंत करेन; प्रियंका गांधींचा 'आर या पार'चा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 9:46 AM

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मायावतींनी केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

नवी दिल्लीः काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मायावतींनी केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मायावतींनी काँग्रेस आणि भाजपा एकाच ताटाच्या दोन बाजू आहेत. काँग्रेसला मत देणं म्हणजे आपलं मत बरबाद करण्यासारखं आहे. काँग्रेस अप्रत्यक्षरीत्या भाजपाला फायदा पोहोचवत असल्याचा आरोप मायावतींनी केला होता. त्यावर प्रियंका गांधी म्हणाले, भाजपाला फायदा पोहोचवण्याऐवजी मी मरणं पसंत करेन, मी कधीही अशा जहाल आणि विध्वंसक विचारधारेशी समझोता करणार नाही. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस उमेदवारांना भाजपाची मतं मिळत असल्याचंही प्रियंका गांधींनी सांगितलं आहे. कालच समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला रोखण्यासाठी काँग्रेस आणि भाजप युती करून उत्तर प्रदेशात निवडणुकीला सामोरे जात असल्याचा आरोप मायवाती यांनी केला होता. एक सभेत त्या बोलत होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी बहुजन समाजपक्षाची निर्मिती झाली. भाजपाने देखील काँग्रेसप्रमाणे नकली आंबेडकरवादी होण्याची उठाठेव सुरू केली आहे. ही उठाठेव भाजपाने करू नये, असा सल्ला मायवती यांनी दिला होता. तसेच बसपा आणि सपा युतीसंदर्भात काँग्रेसकडून देखील वाटेल ते वक्तव्य करण्यात येत आहे.

यावरून काँग्रेस आणि भाजपने आपापसात युती केल्याची उघड होते, असंही मायावती यांनी म्हटले होते. त्यावेळी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी म्हटले होते की, उत्तर प्रदेशात काँग्रेसने मजबूत उमेदवारी दिले आहेत. सगळेच उमेदवार जिंकतील, काही जिंकू शकले नाही, तरी ते भाजपला नुकसान करतील, असंही प्रियंका यांनी सांगितले होते. यावर मायवती म्हणाल्या की, काँग्रेसचे अधिकाअधिक उमेदवार भाजपाला फायदा पोहोचविण्यासाठीच आहे. तर सप-बसपचं रिमोट कंट्रोल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात असल्याचे बुधवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले होते.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019mayawatiमायावती