उन्हाच्या दाहकतेत लग्नांची धामधूम
By admin | Published: April 28, 2016 12:32 AM
यावर्षी तापमानाने उंचांक गाठला असून प्रत्येकजण उन्हाच्या दाहक तेपासून वाचण्यासाठी उपाययोजना करताना दिसत आहेत. मात्र एवढ्या उन्हातही लग्न सराईची धामधूम सुरू असून त्यामुळे रेल्वेत गर्दी ओसंडून वाहत आहे.
यावर्षी तापमानाने उंचांक गाठला असून प्रत्येकजण उन्हाच्या दाहक तेपासून वाचण्यासाठी उपाययोजना करताना दिसत आहेत. मात्र एवढ्या उन्हातही लग्न सराईची धामधूम सुरू असून त्यामुळे रेल्वेत गर्दी ओसंडून वाहत आहे. त्यातच गेल्या तीन दिवसापासून लग्नतिथी मोठी असल्याने एकाच दिवशी दोन ते तीन लग्नांना हजेरी लावावी लागत आहे. लग्न सोहळा म्हटले म्हणजे तेथे जाणे गरजेचेच. त्यासाठी प्रवास हा अटळ. बर्याचदा लग्नकार्यात सहभागी होण्यासाठी दुचाकी, चारचाकी, तसेच एसटीच्या बसेस्चा वापर केला जातो. मात्र उन्हाचा पारा तापल्याने वरील वाहनांनी प्रवास करणे म्हणजे धोक्याचे. म्हणून उन्हापासून बचावासाठी प्रवाशांनी रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य दिले. प्रत्येक रेल्वे स्थानकावर गर्दी वाढली असून गाड्यांमध्ये पाय ठेवायला जागाही नाही. त्यामुळे आरक्षणाची प्रतीक्षा यादी वाढली असून प्रत्येक गाडीला शंभर ते दीडशेच्या वर वेटिंग आहे.