नवी दिल्ली : दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंचे तंबू पोलिसांनी उखडून फेकले आहेत. कुस्तीपटूंना आता पुन्हा जंतरमंतरवर आंदोलन करू दिले जाणार नाही. त्यांनी आंदोलनासाठी परवानगी मागितली तर त्यांना याऐवजी दुसरे ठिकाण दिले जाऊ शकेल, असे दिल्ली पोलिसांनी सोमवारी स्पष्ट केले. या दरम्यान, रविवारी कुस्तीपटूंना ताब्यात घेण्यात आले तेव्हा बजरंग पुनियाने ‘आम्हाला गोळी मारा’ असे म्हटले होते. त्यावर एका माजी आयपीएस अधिकाऱ्याने वादग्रस्त व्यक्तव्य केल्याने वादाला तोंड फुटले आहे.
जंतरमंतरवर आंदोलनाची परवानगी नाहीकुस्तीपटूंना आता पुन्हा जंतरमंतरवर आंदोलन करू दिले जाणार नाही. त्यांनी आंदोलनासाठी परवानगी मागितली तर त्यांना याऐवजी दुसरे ठिकाण दिले जाऊ शकेल, असे दिल्ली पोलिसांनी सोमवारी स्पष्ट केले.
‘पोस्टमॉर्टम टेबलवर पुन्हा भेटू’!“गरज पडल्यास आम्ही गोळी मारू. पण, तुमच्या म्हणण्याने नाही. आता केवळ कचऱ्याच्या पिशवीप्रमाणे ओढून तुम्हाला फेकून दिले आहे. पोलिसांना कलम १२९ नुसार गोळी मारण्याचा अधिकार आहे. ती इच्छादेखील योग्य परिस्थितीत पूर्ण होईल. पण हे जाणून घेण्यासाठी शिकणे आवश्यक आहे. पोस्टमॉर्टम टेबलवर पुन्हा भेटू! डॉ. एन. सी. अस्थाना, माजी आयपीएस
७०० आंदोलक ताब्यातआंदोलकांनी महापंचायतसाठी जंतरमंतरवरून निघू नये म्हणून पोलिसांनी त्यांच्याभोवती सुरक्षाकडे केले होते. कुस्तीपटूंनी हे कडे भेदण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांची पोलिसांशी चकमक उडाली. पोलिसांनी ७०० आंदोलकांना ताब्यात घेतले आहेत.
कुस्तीपटूंवर गुन्हारात्री उशिरा आंदोलकांना सोडून देण्यात आले. अटींचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आंदोलक कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.
तुम्ही सांगाल तिथे येण्याची तयारी...हे आयपीएस अधिकारी आम्हाला गोळ्या घालण्याबाबत बोलत आहेत. आम्ही गोळ्या झेलायला तयार आहोत, तुम्ही सांगाल तिथे येतो. शपथ घेतो की, मी माझी पाठ दाखवणार नाही, मी माझ्या छातीवर तुमची गोळी खाईन. आमच्याबरोबर फक्त हीच गोष्ट उरली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोवर मागे हटणार नाही.- बजरंग पुनिया, कुस्तीपटू