शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

सुवाच्य, मोठ्या अक्षरात प्रिस्क्रिप्शन लिहा! राज्य सरकारला परिपत्रक काढण्याचे कोर्टाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 7:27 AM

न्यायाधीशांना डॉक्टरांनी लिहिलेली भाषा कळेना अन्...

कटक : आता डॉक्टरांना सर्व प्रिस्क्रिप्शन आणि वैद्यकीय-कायदेशीर अहवाल सुवाच्य  हस्ताक्षरात, शक्य असल्यास मोठ्या अक्षरात किंवा टाइप केलेल्या स्वरूपात लिहिण्यास कोर्टाने सांगितले आहे. ओरिसा उच्च न्यायालयानेराज्य सरकारला याबाबत एक परिपत्रक काढण्याचे निर्देश दिले आहेत. आदेशानुसार, डॉक्टरांनी सुवाच्च  हस्ताक्षरात, शक्य असल्यास मोठ्या अक्षरात प्रिस्क्रिप्शन लिहिल्यास ही कागदपत्रे वाचताना न्यायपालिकेला ‘अनावश्यक थकवा’ सहन करावा लागणार नाही, असेही कोर्टाने यावेळी म्हटले आहे.

न्यायाधीशांना भाषा कळेना अन्...

न्यायाधीश एस.के. पाणिग्रही यांना याचिकेसोबत जोडलेला पोस्टमार्टेम अहवाल नीट वाचता आला नाही. यातून काहीही न समजल्याने खटल्याचा निर्णय घेणे अवघड गेले, त्यामुळे उच्च न्यायालयाकडून हे निर्देश देण्यात आले.

याचिका काय होती?

डेंकनाल जिल्ह्यातील हिंडोल येथील रसनंद भोई यांचा मोठा मुलगा सौवाग्या रंजन भोई याचा साप चावल्याने मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर त्यांनी सानुग्रह अनुदानासाठी विचार करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी विनंती त्यांनी कोर्टाकडे केली होती. त्यावेळी सुनावणीनंतर हायकोर्टाने हे निर्देश दिले.

कोर्टाचे काय निर्देश?

अनेक प्रकरणांमध्ये, शवविच्छेदन अहवाल लिहिताना बहुतेक डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे वैद्यकीय- कायदेशीर कागदपत्रांना समजून घेताना अडचण निर्माण होते. न्यायालयालाही अशी वैद्यकीय कागदपत्रे वाचणे कठीण जाते. डॉक्टरांमध्ये झिग-झॅग हस्ताक्षराचा ट्रेंड बनला आहे, ज्यामुळे सामान्य व्यक्ती आणि न्यायव्यवस्थेला ही कागदपत्रे वाचणे कठीण होत आहे, असे कोर्टाने म्हणाले.

टॅग्स :doctorडॉक्टरCourtन्यायालयState Governmentराज्य सरकारAssamआसाम