भुनवेश्वर - प्रसिद्ध लेखिका गीता मेहता यांनी पद्मश्री पुरस्कार घेण्यास नकार दिला आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे पुरस्कार स्विकारण्याची ही योग्य वेळ नसल्याचे मेहता यांनी म्हटले आहे. गीता मेहता या ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या मोठ्या बहिण आहेत. गीता मेहता यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
गीता मेहता यांनी एक पत्रकार परिषदेत बोलताना आपण पद्मश्री पुरस्कार स्विकारणार नसल्याचं म्हटलंय. भारत सरकारने मला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं, याचा मला खूप आनंद आहे. मला या पुरस्काराच्या पात्रतेचं मानलं. पण, मी हा पुरस्कार स्विकारू शकत नसल्याचे मेहता यांनी नम्रपणे म्हटले आहे. देशात लवकरच लोकसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे हा पुरस्कार स्विकारल्यास समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो. ज्यामुळे मी आणि सरकार दोघांसाठी मानहानीकारक ठरेल. याबाबत मला नेहमीच खेद वाटेल, असेही मेहता यांनी म्हटलंय.
गीता मेहता यांनी शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. देशातील चौथ्या क्रमाकांचा सर्वोच्च पुरस्कार म्हणून पद्मश्री पुरस्कार दिला जातो. गीता यांनी गेल्या 40 वर्षांपासून साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले असून अनेक पुस्तके लिहिली आहेत. दरम्यन, सध्या गीता मेहता न्यूयॉर्कमध्ये राहतात. गृहमंत्रालयाने त्यांना फॉरेनर कॅटेगिरीमध्ये हा पुरस्कार जाहीर केला आहे.