नवी दिल्ली : भारतात तसेच आशिया खंडात कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटत असताना युरोपमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सर्वत्र चिंता व्यक्त होते आहे. त्या पार्श्वभूमीवर कोवॅक्सिन ही लस तयार करणाऱ्या भारत बायोटेकच्या प्रमुख किरण मजुमदार शॉ यांनी युरोपने कोरोनाची लस निवडण्यात चूक केली की काय, अशी शंका उपस्थित करणारा प्रश्न विचारला आहे. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी शास्त्रज्ञ आणि ॲस्ट्राझेनका या आंतरराष्ट्रीय औषध कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल सोरिओट यांनी या चुकीच्या शक्यतेकडे बोट दाखविले असल्याचा उल्लेख केला आहे. या कंपनीने तयार केलेल्या कोविशिल्ड या लसीची निर्मिती भारतात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट करीत आहे. भारतात तीच लस सर्वाधिक लोकांना दिली गेली आहे. त्याचा उल्लेख करून त्या म्हणतात, कोविशिल्डमधील टी सेल्सच्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे भारत चांगल्या स्थितीत आहे.युरोपमध्ये मॉडर्नाची जी लस देण्यात आली, तिचा परिणाम लगेच जाणवला हे खरे असले तरी दीर्घ काळासाठी ती परिणामकारक ठरत नसावी. पास्कल सोरिओट यांनीही वयस्क लोकांमध्ये मॉडर्नाच्या लसीपेक्षा ॲस्ट्राझेनेकाच्या लसीने अधिक संरक्षण होते, असे म्हटले आहे.
युरोपमध्ये लस निवडण्यात चूक? किरण मजुमदार शॉ यांचा प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 10:25 AM