नवी दिल्ली : शाओमीने गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चीनमध्ये Redmi 9A स्मार्टफोन लाँच केला होता. हा फोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच झाला होता. आता या फोनचे एन्ट्री लेव्हल व्हेररिअंट लाँच केले आहे. हा फोन २ जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेजचा असणार आहे. भारतात या फोनची किंमत 6000 पेक्षाही कमी असण्याची शक्यता आहे.
शाओमीने स्वस्तामध्ये 4 जी फोन भारतात आणून चांगलेच बस्तान बसविले होते. शाओमीचा Redmi 9A च्या या स्वस्त व्हेरिअंटची किंमत चीनमध्ये 499 युआन आहे. म्हणजेच भारतात 5300 रुपये आहे. यामध्ये वॉटरड्रॉप नॉचचा 6.53 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिझोल्यूशन 720 x 1600 पिक्सल आहे. तर अस्पेक्ट रेशो 20:9 आहे. फोनच्या पुढील बाजुला 5 मेगापिक्सलचा कॅमेरा सेल्फीसाठी देण्यात आला आहे. या कॅमेरामध्ये HDR आणि गेस्चरसारखे फिचर आहेत.
या फोनमध्ये 5000 एमएएचची बॅटरी असून 13 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा युजरला HDR, पोर्ट्रेट मोड, AI सीन रिकॉग्निशन, टाइम-लैप्स फोटोग्राफी सारखे फिचर देतो. शाओमीच्या या एन्ट्रीलेव्हल स्मार्टफोनमध्ये Helio G25 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच बॅटरी 10W चार्जिंगची क्षमता ठेवते. हा फोन अँड्रॉईड 10 वर चालणारा असून MIUI 12 सोबत येतो. दोन सिमच्या याफोनमध्ये मायक्रोएसडी कार्डसाठी वेगळा स्लॉट देण्यात आला आहे.
शाओमीच्या या फोनमध्ये ड्युअल स्पीकर्स, Wi-Fi 802.11 b/g/n, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, मायक्रोयुएसबी आणि 3.5 एमएम ऑडिओ जॅक देण्यात आला आहे. मात्र, यामध्ये फिंगरप्रिंट रीडर देण्यात आलेला नाही.
अन्य महत्वाच्या बातम्या...
पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा मुलगा IAS बनला; वाचा प्रदीप सिंह यांची संघर्षमय कहानी
UPSC IAS, IPS परीक्षेचा निकाल जाहीर; प्रदीप सिंह देशभरात टॉपर
यंदा LIC चा आयपीओ मालामाल करणार; या कंपन्या करणार शेअर बाजारात एन्ट्री
सुशांतच्या खात्यातून 17 नाही, 50 कोटी काढले; बिहारच्या डीजीपींचा मुंबई पोलिसांवर आरोप
RBI Recruitment: फक्त एक इंटरव्ह्यू; रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी