नवी दिल्ली : लॉकडाऊन लागू झाल्यापासून गेल्या २२ दिवसांत यमुना नदीच्या पाण्यातील प्राणवायूची (आॅक्सिजन) गुणवत्ता सुधारली आहे, असे दिल्ली जल बोर्डाने केलेल्या पाहणीत आढळले आहे. जल बोर्डाने नुकतेच यमुनेच्या पाण्याचे वेगवेगळ्या पाच ठिकाणचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यात प्रदूषणाचे प्रमाण अधिक असलेल्या वजिराबाद, ओखला परिसरातील पाण्याचे नमुनेही होते. वजिराबाद व ओखला येथील पाण्याची गुणवत्ता सुधारली आहे.
यमुना नदीत औद्योगिकीकरणातून निर्माण होणारे दूषित पाणी मिसळणे बंद झाल्यामुळे पाण्याची गुणवत्ता सुधारली आहे, असे जल बोर्डच्या अधिकाऱ्याने सांगितले. सध्या तपासणी करण्यात आलेले नमुने आंघोळीसाठीही वापरता येईल इतके चांगले असल्याचे ते म्हणाले. लॉकडाऊन लागू असल्यामुळे येथील उद्योगधंदे बंद आहेत. या उद्योगांतून मोठ्या प्रमाणावर दूषित पाणी नदीत मिसळल्यामुळे ७० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी प्रदूषित झाले होते.