ग्वाल्हेर: मध्य प्रदेशच्या राजकारणातलं मोठं नाव असलेल्या ज्योतिरादित्य सिंधियांनी दीड वर्षापूर्वी काँग्रेसचा हात सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सिंधिया यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांच्या कुटुंबातील संपत्तीचा वाद संपेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र ज्योतिरादित्य यांच्या सर्वात लहान आत्येमुळे हा वाद सुटत नाहीए. नुकत्याच आलेल्या एका पुस्तकात या वादाची माहिती आहे. ज्योतिरादित्य यांना तीन आत्या आहेत. पैकी दोन मोठ्या आत्यांना संपत्तीत रस नाही. मात्र तिसरी आत्या संपत्तीमधील हक्क सोडण्यास तयार नाही.
ग्वाल्हेरमधील राजघराणं असलेल्या सिंधियांकडे असलेल्या संपत्तीचा आकडा प्रचंड मोठा आहे. देशातील अनेक राज्यांच्या अर्थसंकल्पांपेक्षा अधिक संपत्ती सिंधिया यांच्याकडे आहे. या संपत्तीचा वाद गेल्या चार दशकांपासून सुरू आहे. ज्योतिरादित्य यांच्या भाजप प्रवेशानं वाद मिटेल अशी शक्यता होती. मात्र भाजप प्रवेश होऊन दीड वर्ष उलटूनही वाद कायम आहे. ज्योतिरादित्य यांची आत्या आणि मध्य प्रदेश सरकारमध्ये मंत्री असलेल्या यशोधराराजे सिंधिया यांच्यामुळे हा वाद कायम असल्याचा दावा एका पुस्तकात करण्यात आला आहे.ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न फसला, दुचाकीस्वार थेट बसच्या खाली आला; पुढे चमत्कार घडला
हाऊस ऑफ सिंधियाज पुस्तकात असलेल्या माहितीनुसार, ज्योतिरादित्य आणि त्यांच्या तिन्ही आत्यांनी (उषाराजे, वसुंधराराजे आणि यशोधराराजे) मध्यंतरी न्यायालयाबाहेर सर्वसंमतीनं वाद मिटवण्याचे प्रयत्न केले. त्यासाठी आत्यांच्या वकिलांनी न्यायालयात अर्जदेखील केला. मात्र जून २०१९ मध्ये अर्ज मागे घेण्यात आला.
दोन मोठ्या आत्यांकडे प्रचंड संपत्ती, लहान आत्येची स्थिती वेगळीज्योतिरादित्य यांच्या दोन मोठ्या आत्यांकडे प्रचंड संपत्ती आहे. उषाराजेंचा विवाह नेपाळमधल्या राजघराण्यात झाला आहे. त्या तिथेच असतात. दुसरी आत्या ज्योतिरादित्य सिंधिया यांचा विवाहदेखील राजघराण्यात झाला. त्या राजस्थानच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत. त्यांच्याकडेही खूप संपत्ती आहे. लहान आत्या यशोधरराजेंची स्थिती वेगळी आहे. त्यांनी एका सर्वसामान्य व्यक्तीशी विवाह केला. त्यांचे पती कार्डिओलॉजिस्ट आहेत. लग्नानंतर त्या अमेरिकेल्या गेल्या होत्या. मात्र घटस्फोटानंतर त्या भारतात परतल्या. त्यांना तीन मुलं आहेत. भारतात आल्यावर त्या राजकारणात सक्रीय झाल्या. सध्या त्या मध्य प्रदेश सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यांची आर्थिक स्थिती मोठ्या बहिणींप्रमाणे नाही. त्यामुळेच त्या संपत्तीवरील हक्क सोडण्यास तयार नाहीत.इतिहासाचं वर्तुळ पूर्ण होणार? रतन टाटा खास मिशनवर; स्पेशल १२ अधिकारी लागले कामाला
संपत्तीचा आकडा नेमका किती?१९५७ पासूनच्या निवडणुकांमध्ये सिंधिया घराण्यातील उमेदवारांनी त्यांच्या संपत्तीची माहिती निवडणूक आयोगाला दिली. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यांच्या शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांची संपत्ती २ अब्जहून अधिक आहे. मात्र सिंधिया ज्या संपत्तीवरून कोर्ट कचेऱ्यांमध्ये लढत आहेत, त्या संपत्तीचं मूल्य ४० हजार कोटी म्हणजेच ४०० अब्ज रुपये आहे.