यशोमती ठाकूर दिल्लीत स्मृती इराणींना भेटल्या; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
By मोरेश्वर येरम | Published: December 18, 2020 07:26 PM2020-12-18T19:26:25+5:302020-12-18T19:35:30+5:30
काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांची शुक्रवारी भेट घेतली.
नवी दिल्ली
काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांची शुक्रवारी भेट घेतली. यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर याबाबतची माहिती दिली आहे.
यशोमती ठाकूर यांनी यावेळी इराणी यांच्याकडे केंद्र शासनाच्या २०२०-२१ मधील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पूरक पोषक कार्यक्रमासाठी २००३ कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यासाठीचे निवेदन दिले.
स्मृती इराणी यांच्यासोबत यावेळी केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाचे सचिव राम मोहन मिश्रा, राज्याच्या महिला बालविकास विभागाच्या सचिव इद्झेस कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो, महिला बालविकास आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद उपस्थित होते.
महिला एवं बालविकास विभाग से जुडे विभिन्न मुद्दों और समस्याओं को लेकर केंद्रीय महिला एवं बालविकास मंत्री @smritiirani जी से मुलाकात की। राज्य की कई योजनाएं केंद्र से जुडी हुई है, इन योजनाओं के बारे में विस्तार से चर्चा हुई। pic.twitter.com/ARYI2t1Amu
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) December 18, 2020
"महाराष्ट्रात आम्ही काही समस्यांना तोंड देत आहोत. अनेक विषयांवर स्मृती इराणी यांच्यासोबत सविस्तर बोलणं झालं. या बैठकीतून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल अशी आशा आहे. लहान मुलांसोबत आणि स्तनदा माता किंवा मग गर्भवती मातांसोबत आपण राजकारण नाही करु शकत. त्यामुळे महाराष्ट्राचे जे अडकेलेल पैसे आहेत. ते नक्की राज्याला मिळतील अशी आशा आहे", असं यशोमती ठाकूर यांनी इराणी यांच्यासोबतच्या भेटीनंतर सांगितलं.
महाराष्ट्रच्या महिला व बालविकास मंत्री श्रीमती @AdvYashomatiINC यांनी केंद्रीय @MinistryWCD मंत्री श्रीमती @smritiirani यांची नवी दिल्ली येथे भेट घेतल्यानंतर #MahaInfoCentre सोबत संवाद साधला. pic.twitter.com/jJXtYmvUFx
— महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) December 18, 2020