युवाशक्तीतर्फे शिरसोलीला पाणी जलदिन : होळी साजरी न करता जपली सामाजिक बांधिलकी
By admin | Published: March 23, 2016 12:12 AM
जळगाव : युवाशक्ती फाउंडेशनतर्फे गेल्या दोन वर्षांपासून काव्यरत्नावली चौकात सार्वजनिक रंगपंचमी साजरी केली जात असते. दुष्काळीस्थिती लक्षात घेता युवाशक्ती फाउंडेशनतर्फे टंचाईग्रस्त शिरसोली गावात टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला.
जळगाव : युवाशक्ती फाउंडेशनतर्फे गेल्या दोन वर्षांपासून काव्यरत्नावली चौकात सार्वजनिक रंगपंचमी साजरी केली जात असते. दुष्काळीस्थिती लक्षात घेता युवाशक्ती फाउंडेशनतर्फे टंचाईग्रस्त शिरसोली गावात टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला.युवा शक्ती फाउंडेशतर्फे दोन वर्षांपासून रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात येत आहे. यामध्ये रेन डान्स, पाण्याचे कुंड उभारून व नैसर्गिक रंगाचा वापर करण्यात येत होता. या उपक्रमात दोन ते तीन हजार नागरिक सहभागी होते.यावर्षी दुष्काळीस्थिती असल्याने रंगपंचमी उत्सव साजरा न करता कोरड्या रंगानी होळी साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. रंगपंचमीसाठी वापरण्यात येणारे पाणी जागतिक जलदिनी शिरसोली प्र.न.या गावात वाटप करण्यात आले. त्यानुसार पाच हजार लीटरची क्षमता असलेले सहा टँकर मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास शिरसोली प्र.न.गावातील चिंचपुरा, पाटील वाडा, विठ्ठल मंदिर चौक, चार नळ परिसर, इंदिरा नगर भागात वाटप करण्यात आले. यावेळी युवाशक्तीचे संस्थापक विराज कावडिया, युवाशक्तीचे जलदूत सचिव अमित जगताप, श्वेता चौधरी, मंजित जांगीड, भूषण सोनवणे, राहुल चव्हाण, दीपक धनजे, विनोद सैनी, विपीन कावडीया, हितेश पाटील, समीर कावडिया, प्रीतम नारखेडे, पियूष बाविस्कर, प्रशांत गायकवाड यांच्यासह शिरसोलीचे सरपंच अर्जुन काटोले, ग्रा.पं.सदस्य अनिल पाटील, रामकृष्ण काटोले, विलास बोबडे, राजेश नाईक, जितेंद्र छाजेड, मनोज अस्वार, भागवत ताडे उपस्थित होते.चौकटप्रत्येक रविवारी टँकरने पाणीशिरसोली प्र.न.या गावात सध्या २५ ते ३० दिवसाआड पाणी पुरवठा होतो. पाण्यासाठी लहान मुले, महिला व नागरिकांची होणारी पायपीट लक्षात घेता युवाशक्ती फाउंडेशनतर्फे ३१ मे २०१६ पर्यंत प्रत्येक रविवारी ३० हजार लीटर पाण्याचे वाटप करण्यात येणार आहे.