शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
“विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
4
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
6
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
7
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
9
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
10
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
11
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
12
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
13
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
14
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
15
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
16
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
18
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
19
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा, निकालानंतर निदर्शकांकडून दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 7:21 AM

फुटीरवादी नेते यासिन मलिक यांना सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा दुर्दैवी आहे. यामुळे शांततेच्या प्रयत्नांना झटका बसला आहे, असे गुपकर आघाडीने म्हटले आहे

नवी दिल्ली : काश्मिरी फुटीरवादी नेता यासिन मलिक याला दिल्लीतील न्यायालयाने दहशतवादाला आर्थिक रसद प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश प्रवीण सिंह यांनी बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा, भादंविअन्वये विविध गुन्ह्यांसाठी वेगवेगळ्या अवधीची शिक्षा सुनावली. कोर्टाने मलिक याला १० लाख रुपयांचा दंडही सुनावला आहे.

मलिकला दोन गुन्ह्यांसाठी भादंवि कलम १२१ (भारत सरकारविरुद्ध युद्ध छेडणे) आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यातील कलम १७ अन्वये जन्मठेप सुनावली. सर्व शिक्षा एकाच वेळी भोगायच्या आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) यासिन मलिक यांना मृत्युदंड देण्याची विनंती केली होती.कोर्टाने जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख यासिन मलिक याला १९ मे रोजी दोषी ठरविले होते. मलिक याने सर्व आरोप मान्य केले होते. कोर्टाने मलिक याला दंड ठोठावण्यासाठी एनआयएच्या अधिकाऱ्यांना त्याच्या आर्थिक स्थितीचे आकलन करण्याचे निर्देश दिले होते. दहशतवादासाठी आर्थिक रसद पुरविल्याप्रकरणी २०१७ मध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात त्याला २०१९ च्या सुरुवातीला अटक करण्यात आली होती.

हे होते आरोपयासिन मलिक याच्यावर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यातील (यूएपीए) कलम १६ (दहशतवादी कृत्य), कलम १७ (दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारणे) कलम १८ (दहशतवादी कृत्याचा कट) कलम २० (दहशतवादी टोळी किंवा संघटनेचा सदस्या, तसेच भादंवि कलम १२०-बी (गुन्हेगारी कटकारस्थान) आणि १२४-ए (राजद्रोह) अन्वये आरोप ठेवण्यात आले होते.

निदर्शकांकडून दगडफेक n यासिन मलिक याच्या शिक्षेबाबत कोर्टाचा निर्णय घोषित होण्याआधी बुधवारी श्रीनगरमधील काही भाग बंद होते. शहरातील मैसुमा परिसरात जेकेएलएफ प्रमुख यासिन मलिक याचे समर्थक आणि सुरक्षा दलांदरम्यान संघर्ष झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. n लाल चौकापासून काही अंतरावर असलेल्या मैसुमा परिसरातील मलिक याच्या घराबाहेर महिलांसह मोठ्या संख्येने लोक जमले. त्यांनी मलिक याच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या आणि मोर्चाही काढला. n निर्दशकांना पांगविण्यासाठी अश्रुधुराचा मारा करणाऱ्या सुरक्षा दलांवर काही निदर्शकांनी दगडफेक केली. तथापि, कोणीही जखमी झाले नाही. n मैसुमा आणि लाल चौकासह आसपासच्या भागातील बहुतांश दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. n जुन्या शहरातील काही भागांतही दुकाने बंद होती. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत.

शांततेच्या प्रयत्नांना झटका : गुपकर आघाडीफुटीरवादी नेते यासिन मलिक यांना सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा दुर्दैवी आहे. यामुळे शांततेच्या प्रयत्नांना झटका बसला आहे, असे गुपकर आघाडीने म्हटले आहे. द पीपल्स अलायन्स फॉर गुपकर डिक्लरेशन (पीएजीडी) प्रवक्ते एम. वाय. तरिगामी यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, यामुळे जम्मू-काश्मीरमधील अनिश्चिता आणखी वाढेल आणि परकेपणा आणि फुटीरवादी भावनांना उत्तेजन मिळेल. एनआयए कोर्टाने निर्णय दिला; परंतु, न्याय दिला नाही.

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरCourtन्यायालय