शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

यंदा गोव्यात डेफएक्स्पो-इंडिया

By admin | Published: March 15, 2016 2:23 AM

गोव्यात होणाऱ्या ‘डेफएक्स्पो-इंडिया-२०१६’ प्रदर्शनात ४६ देशांतील ९७७ कंपन्या सहभागी होत असून दिल्लीबाहेर पहिल्यांदाच गोव्यात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

पणजी : गोव्यात होणाऱ्या ‘डेफएक्स्पो-इंडिया-२०१६’ प्रदर्शनात ४६ देशांतील ९७७ कंपन्या सहभागी होत असून दिल्लीबाहेर पहिल्यांदाच गोव्यात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. २८ ते ३१ मार्चदरम्यान दक्षिण गोव्यातील क्वेपेम तालुक्यातील नॅक्वेरी क्विटॉल येथे आयोजित करण्यात आलेले हे नववे प्रदर्शन होय.नौदल, पायदळ आणि अंतर्गत सुरक्षा प्रणालीच्या या प्रदर्शनात ४६ देशांमधील संरक्षण क्षेत्रातील ९७७ कंपन्या सहभागी होणार असून यासाठी या सर्व कंपन्यांनी नोंदणीही केली आहे. भारतातील या नवव्या प्रदर्शनात अमेरिका, रशिया, स्वीडन, कोरिया प्रजासत्ताक, स्वीत्झर्लंड, संयुक्त अरब अमिरात आणि पोर्तुगालसह ४६ देश सहभागी होत आहेत. आठवे प्रदर्शन फेब्रुवारी २०१४ मध्ये आयोजित करण्यात आले होते. यातही देश-विदेशातील संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांनी लक्षणीय सहभाग नोंदविला होता.संरक्षण मंत्रालयाने या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनावर एक वेबसाईट तयार केली आहे. ‘डेफएक्स्पो-इंडिया-२०१६’ हे प्रदर्शन विकासाचे सुकाणू असून प्रत्येक प्रदर्शनाला आंतरराष्ट्रीय स्तरांवरून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आला आहे, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी विविध विषयांवर परिसंवाद होतील. २९ मार्च रोजी असोचेमच्या वतीने जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.