नवी दिल्ली - यंदाची ईद, दिवाळी आणि दसराही मास्कसह असेल. हिवाळा आता सुरूच होईल. त्यात सहा फूट अंतर आणि मास्क गरजेचा आहे. निष्काळजीपणामुळे ९० टक्के लोकांना कोरोना होऊ शकतो, असा इशारा कोरोना टास्क फोर्सचे अध्यक्ष आणि नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिला.
15 टक्के देशात लोक अजूनही बाधित आहेत. म्हणून सावधगिरी आवश्यक आहे. जागतिक तज्ज्ञ वारंवार हे सांगत आहेत की कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही. अशी माहिती पॉल यांनी दिली.दिलासादायक : ग्रामीण क्षेत्र अपेक्षेप्रमाणे कमी प्रभावितसगळ््यात जास्त कोरोना प्रभावित शहरात झोपडपट्ट्या आणि शहरी झोपडपट्टी नसलेले भाग आहेत. ग्रामीण क्षेत्र अपेक्षेप्रमाणे कमी प्रभावित आहे.महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली. मात्र केरळमध्ये ती वाढते ही चिंतेची बाब आहे, असे पॉल म्हणाले.सिरो सर्व्हे-२ : कोविडचा प्रसार कोणत्या ठिकाणी किती?आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सिरो सर्व्हे-२ बद्दल म्हटले की, ‘१० वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाची प्रत्येक १५ वी व्यक्ती कोरोनाबाधित झाली आहे.आयसीएमआरने १७ आॅगस्ट ते २२ सप्टेंबरपर्यंत २९,०८२ लोकांमध्ये दुसरा सिरो सर्व्हे केला. त्यात ६.६ टक्के लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली.सर्वसामान्यांसाठी : ही पथ्ये पाळा, धोका टळू शकतोहिवाळ््यात सर्दी, पडसे, खोकला, ताप व न्यूमोनिया होणे सामान्य आहे. सर्दी टाळायला हवी. हळद घातलेले दूध प्यावे, च्यवनप्राश खा आणि हात स्वच्छ ठेवा. काढा जरूर प्यावा, असा सल्ला त्यांनी दिला.प्रशासनासाठी : पाच - टी धोरण राबवावे लागेल‘सिरो सर्व्हे अहवालात एक मोठी लोकसंख्या कोरोनाबाधित होण्याची शंका आहे. या परिस्थितीत पाच - टी धोरण (टेस्ट, ट्रॅक, ट्रेस, ट्रीट आणि टेक्नॉलॉजी) राबवावे लागेल,’ असे भार्गव यांनी सांगितले.