श्रीनगर : काश्मीरमधील खासगी शाळांमध्ये तब्बल ३२ वर्षांनंतर हिंदी ही स्वतंत्र भाषा म्हणून शिकविली जाणार आहे. जम्मू-काश्मीर शिक्षण परिषदेने यासाठी आठ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. २० फेब्रुवारीपर्यंत ही समिती काश्मीरमधील ३,००० हून अधिक खासगी शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत शिफारशी सादर करेल.
काश्मिरातील सरकारी व खासगी शाळांमध्ये हिंदी शिक्षकच उपलब्ध नसल्याने तेथे हिंदी शिकविण्याची व्यवस्था नाही.