शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

येवला पालिका निवडणूक ......नगराध्यक्षपदासाठी सर्वच स्वबळ आजमावण्याच्या मन:स्थितीत

By admin | Published: May 22, 2016 7:39 PM

येवला (दत्ता महाले)

येवला (दत्ता महाले)येवला पालिकेची निवडणूक आगामी साडेपाच मिहन्यावर येवून ठेपली असल्याच्या पार्श्वभूमीवर येवल्यात सर्वात अगोदर भाजपने गर्जना केली असली तरी अन्य राजकीय पक्षांनी अद्याप मौन धरले आहे.सध्या केवळ वार्ड निर्मिती कशी होत?आणि नगराध्यक्ष पदासाठी कोणते आरक्षण पडते याच्या प्रतिक्षेत खरे स्पर्धक आहेत.यंदा प्रत्येक पक्षाने स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा सुरु केली आहे.किंबहुना आपल्याच पक्षाचा नगराध्यक्ष असावा यासाठी तयारीला लागा असा संदेश असल्याचे खाजगीत सर्व पक्षाचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.आगामी मिहनाभरात पालिकेच्या नगराध्यक्षपदासह नगरसेवकांच्या पदासाठी याद्यासह आरक्षण निश्चिती होईल.त्यानंतर खर्या अर्थाने रंग भरण्यास सुरु वात होईल.स्वबळाच्या भाषेचा विचार केला तर येवल्यात प्रमुख असलेल्या 4 पक्षाचे उमेदवार रिंगणात असणार हे नक्की आहे.नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण, महिला आरक्षण ,इतर मागासवर्ग,अनुसूचित जातीजमाती,यापैकी कोणते आरक्षण निघते यावर सारी गणतिे निश्चित होणार आहे.सर्वात अगोदर भाजपने नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजवला आहे.येथील विश्रामगृहावर भाजपने एका बैठकीचे आयोजन केले होते.या बैठकीत प्रास्ताविकात शहराध्यक्ष यांनी स्वबळाचा एकला चलोरे चा सूर लावला.कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे.भाजपचा नगराध्यक्ष व्हायलाच हवा असा सूर लावला गेला.यातून भाजप आपली ताकद आजमावण्याच्या मनिस्थतीत असल्याचे दिसत आहे.खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी पैशावाल्याला तिकीट नाही म्हणत गल्लीतच तिकिटे मिळतील दिल्लीत नाही असे सुतोवाच करून कार्यकर्त्यांची नस ओळखली परतू ,भाजापला नव्यानेच माजी आमदार कल्याणराव पाटील यांचे नेतृत्व मिळाले आहे.त्यांनी सन 2001 ची पालिकेची निवडणूक हाताळली आहे.भाजपला नवे बळ मिळवून देण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारल्याचे दिसत आहे.आणि त्यामुळे त्यांनी पक्ष देईल त्या सक्षम उमेदवारामागे उमेदवारामागे उभे राहण्याचे आवाहन केले.एका झेंड्याखाली एकित्रत येवून मतभेद विसरा आणि भाजपचा नगराध्यक्ष करा.असे आवाहन करून सभा संपली.दुसरीकडे सेनेने अद्याप आपला पत्ता खोलला नसला तरी शिवसेनेचे विधानसभा उमेदवार संभाजीराजे पवार,व शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जिल्हा बँक चेअरमन नरेंद्र दराडे,आणि किशोर दराडे यांना देखील शिवसेनेचा नगराध्यक्ष येवल्यात होऊ शकतो? हे दाखवायचे असल्यास नवल वाटायला नको.राष्ट्रवादी कॉंग्रेस तर येवल्यात प्रस्थापित आहे.येवला पालिकेत सध्या राष्ट्रवादीची सत्ता आहे.राष्ट्रवादीचे 16 भाजप 3कॉंग्रेस 1,सेना 1,अपक्ष 1असे पक्षीय बलाबल आहे.आ.छगन भुजबळ यांच्या राष्ट्रवादीचे बहुमत पालिकेत आहे.आमदार भुजबळ सध्या आर्थिक गैरव्यवहाराच्या कात्रीत सापडले आहे.कार्यकर्त्यांना त्यांच्या बाहेर येण्याची प्रतीक्षा आहे.त्यामुळे राष्ट्रवादीत अर्थात भुजबळ समर्थकात कमालीचे नैराश्य आहे.त्यामुळे पालिकाच काय? पण कोणत्याही राजकीय हालचालीकडे राष्ट्रवादीचे फारसे लक्ष नाही.कॉंग्रेस पक्षाला निवडणूक आली की घुमारे फुटू लागतात.पण कॉंग्रेसकडे हक्काची हजार पंधराशे मते शहरात आहे.पण नेते असले तरी कार्यकर्ते मात्र नाहीत. तर पदाधिकारी बदल आणि त्यातून नाराजी अणि केवळ पक्षाची पाटी लावण्यापुरते मनसेची ताकद येवल्यात आहे.पण अजून मूळ धरले नाही.येवला शहराची लोकसंख्या 49 हजार 826 झाल्याने, येवला पालिकेचे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत असलेल्या प्रभागनिहाय 23 नगसेवकांची संख्या एकने वाढली असून आता 12 द्विसदस्सीय प्रभागातून 24 नगरसेवक पालिकेचे प्रतिनिधित्व करणार आहेत.यंदा 50 टक्के राखीव धोरणातही 12 पुरु ष व 12 महिला पालिकेत प्रतिनिधित्व करतील.पण नगराध्यक्षपदाचा दोर ज्या पक्षाच्या हातात राहील त्यांना विकासकामे करण्याची संधी राहणार आहे.त्यामुळे आता स्वबळाची भाषा होऊ लागली आहे.येवला पालिकेत महिलांचे संख्यानिहाय प्राबल्य अधिक असल्याने राष्ट्रवादीने सर्वात प्रथम मिहलेला नगराध्यक्ष पदाचा मान दिला.सर्वाना समान संधी देण्याच्या न्यायाने 2 महिला ,2 पुरु ष यांना नगराध्यक्ष पदाची संधी दिली.यातही शहरातील मुख्य असणार्या क्षित्रय,गुजराथी,मुस्लीम ,माळी समाजाला नगराध्यक्ष पदाची संधी दिली.पालिकेच्या मुदतीच्या अखेरच्या टप्प्यात आ.भुजबळ अडचणीत आल्याने अंतिम टप्प्यात नगराध्यक्ष बदलाची हलचाल मंदावली.आणि आणखी एका मोठ्या समाजाला नगराध्यक्ष पदाची संधी हुलकावणी देवून गेली.परंतु या बाबीशी जनतेला फार देणेघेणे नाही.जनतेला मात्र रस्ते ,आरोग्य,पाणी ,पथदीप या गोष्टीशी घेणे आहे.सार्वित्रक जनतेमधून नगराध्यक्ष निवडीबाबत सतत राज्यकर्त्यांच्या राजकीय सोईच्या धरसोडीच्या धोरणात, येवल्यात तीन वेळा जनतेतून नगराध्यक्ष निवडला गेला आहे.1978 साली स्वर्गीय प्रभाकर दादा कासार हे तत्कालीन नांगरधरी शेतकरी घेवून झेंडा फडकावला होता.भाजपची तत्कालीन अंतर्गत दुफळी सन 2001 मध्ये हुसेन शेख यांनी आकड्यांच्या विभाजानाच्या गणतिात अपक्ष उमेदवारी करून बाजी मारत आपला पतंग आकाशात उडवला व सर्वाना धक्का दिला होता.त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.हुसेन शेख यांचेवर जानेवारी 2006 मध्ये अविश्वासाचा ठराव येवून त्यांना पायउतार व्हावे लागले होते.यामुळे िएप्रल 2006 मध्ये झालेली नगराध्यक्ष पदाच्या प्रतिष्ठेच्या सहा मिहन्याच्या पोटनिवडणुकीत पंकज पारख यांनी भाजपचे बंडू क्षीरसागर यांचा पराभव करून राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला.त्यानंतर आता पुन्हा जनतेतून नगराध्यक्षपदाची निवडणूक होत आहे.नगराध्यक्ष पदाचे आरक्षणसोडत शिवाय , ॲॅड. माणकिराव शिंदे यांच्या हाती राष्ट्रवादीचा झेंडा,तर संभाजीराजे पवार, नरेंद्र दराडे यांनी सेनेचा भगवा झेंडा हाती धरला आहे.भाजपचे नवीन शहरअध्यक्ष आनंद शिंदे,कॉंग्रेसशहर अध्यक्ष राजेश भंडारी यांची भूमिका,यावर नगराध्यक्षपदाच्या लढतीची रंगत येणार आहे.