Vijender Singh : झोपेतून उठलो, तेव्हा वाटलं BJP जॉइन करायला हवी; विजेंरद सिंगचे पत्रकाराला उत्तर Video
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 05:02 PM2024-04-03T17:02:39+5:302024-04-03T18:31:15+5:30
मोदी सरकारवर सातत्याने सोशल मीडियावरून टीका करणारा ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंगने बुधवारी भाजपात प्रवेश केला आहे.
Lok Sabha Election 2024 : मोदी सरकारवर सातत्याने सोशल मीडियावरून टीका करणारा ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंगने बुधवारी भाजपात प्रवेश केला आहे. २०१९ साली दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून विजेंदरने काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. पण, अचानक त्याने यू टर्न मारल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे... विजेंदरनेही विकासासाठी भाजपात प्रवेश करत असल्याचे सांगितले. पण, जेव्हा पत्रकाराने त्याला या यू टर्नबाबत थेट प्रश्न विचारला, तेव्हा त्याने दिलेलं उत्तर हास्यास्पद होते.
मथुरा लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार हेमा मालिनी यांच्याविरुद्ध काँग्रेसकडूनविजेंदर सिंग यांना मैदानात उतरवले जाणार होते. मात्र, त्याआधीच त्याने भाजपात प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विजेंदरने दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणि महिला कुस्तीपटूंचं आंदोलन यावरून मोदी सरकारवर सातत्याने टीका केली होती. त्याने ट्विटरवरुन भूमिका मांडताना मोदी सरकारला लक्ष्य केलं होतं. विशेष म्हणजे त्याने कालपर्यंत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या पोस्ट रिट्विट केल्या आहेत
याच मुद्यावरून पत्रकाराने विजेंदरला प्रश्न केला..
- पत्रकार - कालपर्यंत तुम्ही राहुल गांधींसोबत होता, राहुल गांधींचे व्हिडीओ रिपोस्ट करत होतात... मग अचानक काय झालं?
- विजेंदर सिंग - असा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्याने प्रभावित होऊन मी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी ज्याप्रकारे विकासाचं काम करत आहेत, ते कौतुकास्पद आहे. ते जनतेचं हित पाहत आहेत. काल मी राहुल गाधींचा व्हिडीओ रिपोस्ट करून झोपी गेलो आणि जेव्हा जाग आली तेव्हा मनाला वाटलं की मी चुकीचं करत आहे. तुम्ही चुकीच्या माणसासोबत आहे. तेव्हा वाटलं की BJP जॉइन करायला हवी...
Repoter - Kal Tak toh aap RG ke sath the, RG ka video repost Kr rhe the,
— Ashish 𝕏|.... (@Ashishtoots) April 3, 2024
Suddenly what happened
Vijender Singh - Haan video repost karne ke baad main so gaya aur subah utha toh laga BJP join kar leni chahiye.🤣#VijenderSinghpic.twitter.com/ihOrHCSKYf