Loksabha MP Suspension Mimicry of Dhankhar ( Marathi News ): राज्यसभा सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड (jagdeep dhankhar) यांच्या 'मिमिक्री' प्रकरणावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. या घटनेवर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया आली. यावेळी त्यांनी फोनमध्ये व्हिडिओ शूट केल्याचे कबुल केले आणि केंद्र सरकावर टीकाही केली.
बुधवारी(दि.20) संसदेत पत्रकारांशी संवाद साधताना राहुल म्हणाले, 'आम्ही सर्व खासदार तिथेच बसलो होते, मीच तो व्हिडिओ शूट केलाय. व्हिडिओ माझ्या फोनमध्ये आहे. मीडिया फक्त हेच दाखवत आहे, पण आमच्या 150 खासदारांना निलंबित केले, त्यावर मीडियात चर्चा होत नाही. अदानीवर चर्चा नाही, राफेलवर चर्चा नाही, बेरोजगारीवर चर्चा नाही,' अशी टीका राहुल गांधींनी यावेळी केली.
हिवाळी अधिवेशनात गदारोळसंसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून पहिल्या दिवसापासून गदारोळ सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत संसदेत गदारोळ केल्याप्रकरणी सूमारे 140 हून अधिक खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळेच विरोधी पक्षाचे खासदार मंगळवारी संसद भवनाबाहेर बसून आंदोलन करत होते. यादरम्यान, तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची नक्कल करण्यास सुरुवात केली.
संबंधित बातमी- राहुल गांधी बेजबाबदार, TMC खासदाराने माफी मागावी; जाट समाजाचे जगदीप धनखर यांना समर्थन
धनखड यांनी व्यक्त केली नाराजी या मिमिक्रीवर उपराष्ट्रपतींनी नाराजी व्यक्त केली आहे. ही घटना लाजिरवाणी असल्याचे ते म्हणाले. एक खासदार खिल्ली उडवत आहे आणि दुसरा खासदार त्या घटनेचा व्हिडिओ बनवतोय, हे हास्यास्पद आणि अस्वीकार्य आहे. राहुल गांधींच्या या कृतीवर भाजप नेतेदेखील काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत आहेत.