कोझीकोड : प्रेषितांच्या मार्गाने लढा देणे याला कोणी दहशतवाद म्हणत असेल, तर होय मी दहशतवादी आहे, असा संदेश मोहंमद मारवान याने आपल्या कुटुंबियांना पाठविला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या आणि इसिसमध्ये सामील झाल्याचा संशय असलेल्या केरळच्या १५ व्यक्तींपैकी तो एक आहे. त्याने हा संदेश जूनच्या शेवटच्या आठवड्यात टेलिग्राम अॅपवरून पाठविला आहे. दहशतवादी संघटनेच्या कब्जातील पश्चिम आशियातील एका भागातून हा संदेश पाठविल्याचा त्याने दावा केला आहे. हा तरुण प्रत्यक्षात त्याच ठिकाणी आहे का? याबाबत गुप्तचर संस्थांकडून दुजोरा मिळालेला नाही.काश्मीर, गुजरात आणि मुजफ्फरनगरमध्ये मुस्लिमांचा छळ केला जात आहे. इसिससोबतचे काम आटोपल्यानंतर मी त्यांच्या मदतीसाठी परत येईन, असे आश्वासनही मारवान याने या संदेशात दिले आहे. इकडे अमेरिका आणि रशियाच्या बॉम्ब हल्ल्यात मुलांसह मुस्लिमांना ठार मारले जात आहे. मुस्लिम समुदायाची हत्या होत असताना मी घरी स्वस्थ कसा राहू शकतो. (वृत्तसंस्था)>मी परत येईन२३ वर्षांच्या मारवानचा असाही दावा आहे की, मी जे करतो त्याची पूर्णत: मला जाणीव आहे. या संघटनेत भरती होण्यासाठी मला कोणीही भरीस पाडलेले नाही. इस्लामिक स्टेटमधील घडामोडींच्या बातम्या वाचल्यानंतरच मी या लढ्यात उतरण्याचा निर्णय घेतला. या लढ्यात मी ठार झालो, तर मला शहीद माना. ही मोहीम संपल्यानंतर मी परत येईन, अशा आशावादाने त्याने या संदेशाचा शेवट केला आहे.
होय, ... तर मी दहशतवादी आहे !
By admin | Published: July 18, 2016 6:02 AM