अहमदाबाद - देशातील राम मंदिराच्या मुद्द्यावरून आस्था आणि राजकारण नेहमीच होत असते. लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येत आहे, तस तसा राम मंदिरचा मुद्दा तापत आहे. योगगुरु रामदेव बाबा यांनी 'प्रभू रामचंद्र हे फक्त हिंदूंचेच नाही तर मुस्लिमांचेही पूर्वज आहेत, त्यामुळे अयोध्येत राम मंदिर होणारच' असं म्हटलं आहे. अयोध्येत राम मंदिर होणार नाहीतर काय मक्का मदिना किंवा व्हॅटिकनमध्ये होणार का? असा प्रश्न विचारत रामदेव बाबा यांनी राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला आहे.
अहमदबादमधील खेडा जिल्ह्यामध्ये शुक्रवारी (8 फेब्रुवारी) पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटले आहे. 'प्रभू रामचंद्रांचं मंदिर हे अयोध्येतच होणार. अयोध्येत नाही तर काय व्हॅटिकन सिटी किंवा मक्का मदिनाला होणार का? अयोध्या ही रामाची जन्मभूमी आहे हे निर्विवाद सत्य आहे. प्रभू राम हे फक्त हिंदूंचेच नाही तर मुस्लिमांचेही वंशज आहेत' असं रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे.
धूम्रपान सोडा, रामदेव बाबांचं कुंभमेळ्यातील साधूंना आवाहनकाही दिवसांपूर्वी योगगुरु रामदेव बाबा यांनी कुंभमेळ्यात सहभागी होऊन संत आणि साधूंना धूम्रपान सोडण्याचं आवाहन केलं होतं. 'आपण राम आणि कृष्णाचे भक्त आहोत ज्यांनी त्यांच्या जीवनात कधीही धूम्रपान केलं नाही, मग तुम्ही का करता? आपण धूम्रपान सोडणार अशी शपथ घेतली पाहिजे', असं रामदेव बाबा यांनी म्हटलं होतं. रामदेव बाबा यांनी कुंभमेळ्यात असणाऱ्या अनेक साधूंकडून चिलम गोळा केली आणि आपण पुन्हा कधी तंबाखूला हात लावणार नाही अशी शपथ घेण्यास सांगितले होते.